प्रतीक्षा संपली! Powerful फीचर्ससह OnePlus 12 5G आणि OnePlus 12R 5G फोन अखेर भारतात लाँच, जाणून घ्या किंमत। Tech News 

प्रतीक्षा संपली! Powerful फीचर्ससह OnePlus 12 5G आणि OnePlus 12R 5G फोन अखेर भारतात लाँच, जाणून घ्या किंमत। Tech News 
HIGHLIGHTS

OnePlus 12 सिरीज अखेर भारतात लाँच करण्यात आली आहे.

सिरीजअंतर्गत OnePlus 12 5G आणि OnePlus 12R 5G फोन लाँच

OnePlus 12R फोनचा टच पाण्यातही काम करेल.

मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेली OnePlus 12 सिरीज अखेर भारतात लाँच झाली आहे. या सिरीजअंतर्गत कंपनीने OnePlus 12 5G आणि OnePlus 12R 5G फोन लाँच केले आहेत. हे फोन OnePlus 11 सीरीजचे अपग्रेडेड व्हर्जन आहेत. विशेष स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, OnePlus 12R फोनचा टच पाण्यातही काम करेल, यासाठी फोनमध्ये एक्वा टच सपोर्ट उपलब्ध आहे. चला जाणून घेऊयात सिरीजमधील दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.

OnePlus 12 5G भारतीय किंमत

कंपनीने OnePlus 12 5G स्मार्टफोनच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 64,999 रुपये ठेवली आहे. त्याच वेळी, त्याचे 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज मॉडेल 69,999 रुपयांमध्ये येते. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 30 जानेवारीपासून सुरू होईल. या फोनमध्ये Flowy Emerald आणि Silky Black कलर पर्याय उपलब्ध आहेत.

OnePlus 12R launched in India

OnePlus 12R 5G ची भारतीय किंमत

OnePlus 12R 5G फोनची सुरुवातीची किंमत 39,999 रुपये आहे. या किमतीसह फोनचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल येतो. तर, फोनच्या 16GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 45,999 रुपये आहे. या फोनची विक्री 6 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या फोनमध्ये आयर्न ग्रे आणि कूल ब्लू कलर पर्याय उपलब्ध आहेत.

OnePlus 12 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

OnePlus 12 5G मध्ये 6.82 इंच लांबीचा 3D AMOLED flexible QHD+ कर्व डिस्प्ले आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 प्रोटेक्शनसह येतो. याशिवाय, फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 16GB LPDDR5X रॅम देण्यात आली आहे. फोनमध्ये तुम्हाला 512GB स्टोरेज देखील दिली जाईल. हा फोन Android 14-आधारित OxygenOS वर काम करेल. फोनची बॅटरी 5,400mAh आहे, ज्यामध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 50W AirVOOC वायरलेस चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 4थ जनरेशन हॅसलब्लॅड ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP Sony LYT808 प्राथमिक कॅमेरा आहे, ज्यासोबत OIS सपोर्ट उपलब्ध आहे. यासोबतच 64MP 3X टेलिफोटो सेन्सर OmniVision OV64B देण्यात आला आहे. याशिवाय, यात 48MP अल्ट्रा-वाइड Sony IMX581 सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा आहे.

OnePlus 12R 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

OnePlus 12R 5G फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा AMOLED ProXDR डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 प्रोटेक्शन समर्थन उपलब्ध आहे. हा फोन स्मूथ फंक्शनिंगसाठी Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देखील आहे. यात 50MP Sony IMX890 प्राथमिक कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर, 2MP मॅक्रो सेन्सर आणि 16MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 5,500mAh आहे, ज्यामध्ये 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo