OnePlus चा लेटेस्ट स्मार्टफोन OnePlus 12 ची सेल आज 30 जानेवारीपासून भारतात सुरू झाली आहे. हा फोन गेल्या आठवड्यात म्हणजे नुकतेच भारतीय बाजारात लाँच करण्यात आला होता. त्यानंतर, या स्मार्टफोनची विक्री आजपासून सुरु झाली आहे. हा स्मार्टफोन Amazon India आणि OnePlus च्या अधिकृत साईटवर खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात 100W SuperVOOC आणि 50W AirVOOC वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. जाणून घेऊयात फोनची किंमत आणि सेल ऑफर्स-
फोनच्या 12GB रॅम + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 64,999 रुपये आहे. तर, 16GB RAM + 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 69,999 रुपये आहे. पहिल्या सेल ऑफर अंतर्गत, ICICI क्रेडिट कार्ड आणि वनकार्ड व्यवहारांवर 2000 रुपयांची त्वरित सूट दिली जात आहे. डिस्काउंटनंतर OnePlus 12 स्मार्टफोन 62,999 आणि 67,999 रुपयांना खरेदी करता येईल. एवढेच नाही तर, एक्सचेंज ऑफरअंतर्गत, फोनवर 10,000 रुपयांपर्यंत सूट देखील उपलब्ध आहे. या फोनमध्ये Flowy Emerald आणि Silky Black कलर ऑप्शन्स मिळतील. येथून खरेदी करा
OnePlus 12 फोनमध्ये 6.82 इंच लांबीचा ProXDR डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे. स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 हा एक पॉवरफुल परफॉर्मर आहे, जो CPU कार्यक्षमतेच्या बाबतीत मागील जनरेशनपेक्षा खूप पुढे आहे. विभागाबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 12GB रॅम आणि 16GB रॅम आणि 256GB आणि 512GB स्टोरेज ऑप्शन्स उपलब्ध आहेत.
फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये 50MP Sony LYT 808 प्रायमरी कॅमेरा, 64MP OmniVision OV64B पेरिस्कोप सेन्सर आणि 48MP Sony IMX581 तिसरा कॅमेरा आहे. याशिवाय, फोनमध्ये 5400mAh ची बॅटरी आहे, ज्यामध्ये 100W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.