नव्या आणि आकर्षक रंग-रूपात लाँच झाला OnePlus 11R, मिळेल 4000 रुपयांचा Discount। Tech News 

नव्या आणि आकर्षक रंग-रूपात लाँच झाला OnePlus 11R, मिळेल 4000 रुपयांचा Discount। Tech News 
HIGHLIGHTS

कंपनीने OnePlus 11R चे नवीन Solar Red Edition लाँच केले आहे.

सोलर रेड एडिशन स्मार्टफोनच्या खरेदीवर 1000 रुपयांची झटपट सूट

यासह, तुम्ही OnePlus Buds Z2 देखील मोफत मिळवू शकता.

OnePlus ने OnePlus 11R चे नवीन Solar Red Edition लाँच केले आहे. हा प्रीमियम मिड रेंज स्मार्टफोन आहे. हा फोन 18GB रॅम आणि 512GB स्टोरेज पर्यायात येतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, OnePlus 11R भारतात लोकप्रिय स्मार्टफोन आहे. OnePlus 11R चे नवीन सोलर रेड एडिशन भारतात 45,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. एवढेच नाही, तर यासोबत बरेच ऑफर्स देखील देण्यात येत आहेत.

हे सुद्धा वाचा: Hurry! Lava Agni 2 5G ची प्री-बुकिंग फक्त 99 रुपयांपासून सुरू, जाणून घ्या किंमत आणि Offers

OnePlus 11R Solar Red Edition वरील ऑफर्स

वर सांगितल्याप्रमाणे, हा फोन भारतात 45,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध होईल. तुम्हाला 7 ऑक्टोबर 2023 पासून अर्ली ऍक्सेस डिस्काउंट ऑफरमध्ये फोन खरेदी करता येईल. सोलर रेड एडिशन स्मार्टफोनच्या खरेदीवर तुम्ही 1000 रुपयांच्या झटपट सूटचा आनंद घेऊ शकता. त्याबरोबरच, तुम्ही OnePlus Buds Z2 देखील मोफत मिळवू शकता.

oneplus 11r solar red edition
oneplus 11r solar red edition

इतर ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोन 12 महिन्यांच्या नो-कॉस्ट EMI ऑप्शन्ससह खरेदी केला जाऊ शकतो. 8 ऑक्टोबरपासून इन्स्टंट बँक डिस्काउंट ऑफरमध्ये तुम्ही 1000 रुपयांच्या सवलतीत फोन खरेदी करू शकता. तुम्हाला यासह 3000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील मिळेल.

OnePlus 11R Solar Red Edition

नव्या फोनमध्ये 6.74 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz डायनॅमिक रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. फोन Octacore Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट सपोर्टसह येतो. Snapdragon 8 Gen 1 अप्रतिम मल्टीटास्किंग आणि गेमिंग परफॉर्मन्स देतो. हा फोन Android 13 आधारित OxygenOS 13 वर काम करतो.

फोन 50MP मुख्य कॅमेरा सेन्सरसह येतो आणि यात 8MP अल्ट्रा वाईड लेन्स देण्यात आली आहे. तसेच, यासह 2MP मॅक्रो कॅमेरा देखील उपलब्ध आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, त्यासह 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo