digit zero1 awards

अखेर प्रतीक्षा संपली ! Oneplus 11Rची प्री-बुकिंग आजपासून, बघा किमंत आणि फीचर्स

अखेर प्रतीक्षा संपली ! Oneplus 11Rची प्री-बुकिंग आजपासून, बघा किमंत आणि फीचर्स
HIGHLIGHTS

OnePlus 11R 5G 21 फेब्रुवारीपासून Amazon आणि OnePlus Store वर प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध होईल.

फोनची सुरुवातीची किंमत 39,999 रुपये

OnePlus च्या नवीन प्रीमियम फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स जाणून घ्या

OnePlus ने 7 फेब्रुवारी 2023 रोजी OnePlus 11R 5G स्मार्टफोन लाँच केला. आता हा स्मार्टफोन 21 फेब्रुवारी 2023 पासून म्हणजेच आजपासून भारतात प्री-बुकिंगसाठी उपलब्ध होईल. OnePlus 11R अलर्ट स्लाइडर आणि 50 मेगापिक्सेल प्राथमिक सेन्सर आणि 100W जलद चार्जिंग सारख्या फीचर्ससह येतो. जाणून घ्या, OnePlus च्या नवीन प्रीमियम फोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स… 

हे सुद्धा वाचा : Reliance Jio, Airtel आणि Vi चे सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन्स, बघा यादी

OnePlus 11R 5G ची किंमत

OnePlus 11R 5G च्या 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 39,999 रुपये आहे. तसेच, फोनचे 16 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज व्हेरिएंट 44,999 रुपयांमध्ये प्री-बुक केले जाऊ शकते. हा फोन 21 फेब्रुवारीपासून Amazon आणि OnePlus Store वर प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध होईल. फोन सोनिक ब्लॅक आणि गॅलेक्टिक सिल्व्हर कलर पर्यायांमध्ये येतो.

OnePlus 11R 5G चे स्पेसिफिकेशन्स 

नवीन OnePlus 11R मध्ये 6.74-इंच लांबीचा फ्लुइड AMOLED डिस्प्ले आहे, जो 1.5K म्हणेजच 2772×1240 पिक्सेल रिझोल्यूशन ऑफर करतो आणि रीफ्रेश दर 120Hz आहे. फोनमध्ये स्क्रीन कर्व मिळेल. तसेच, यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि स्क्रीनच्या मध्यभागी पंच-होल नॉच आहे.

OnePlus 11R मध्ये ऑक्टा-कोर Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी Adreno 730 GPU आहे. फोन 16GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेजसह येतो. हँडसेटमध्ये Android 13 आधारित OxygenOS 13 देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 100W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते.

फोनमध्ये स्टिरिओ स्पीकर सेटअप आहे, जो डॉल्बी ATMOS ऑडिओसह येतो. कनेक्टिव्हिटीसाठी डिव्हाईसमध्ये ड्युअल-सिम, 5G, Wi-Fi 6 802.11, ब्लूटूथ 5.3, NFC , GPS सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर OnePlus 11R मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह 50 मेगापिक्सेल Sony IMX890 सेन्सर आहे. याशिवाय 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरेही देण्यात आले आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo