OnePlus 11R नवीन फ्लॅगशिप फोनचे डिझाइन आणि स्पेसिफिकेशन लीक, बघा सविस्तर

Updated on 02-Jan-2023
HIGHLIGHTS

OnePlus 11R लॉन्चिंगच्या बातम्या पुढे येत आहेत.

फोन Snapdragon 8 Plus Gen 1 प्रोसेसर आणि LPDDR5 रॅमने सुसज्ज असेल.

फोनसोबत IR ब्लास्टर आणि अलर्ट स्लायडर दिला जाऊ शकतो.

OnePlus फ्लॅगशिप फोन OnePlus 11 5G भारतात 7 फेब्रुवारी रोजी लॉन्च होणार आहे. आता OnePlus 11 सीरीजचा आणखी एक स्मार्टफोन OnePlus 11R लॉन्चिंगची बातमी येत आहे. खरं तर, OnePlus 11R च्या डिझाइन आणि स्पेसिफिकेशनबद्दल माहिती लीक झाली आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन 8 प्लस gen 1 प्रोसेसरने सुसज्ज असेल, असा दावा केला जात आहे. 

हे सुद्धा वाचा : Jio Recharge: 56 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि अनेक फायदे मिळतील स्वस्तात

OnePlus 11R ची संभाव्य स्पेसिफिकेशन्स

वनप्लसच्या नवीन फ्लॅगशिप फोनची माहिती टिपस्टर योगेश बरार यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहे. टिपस्टरनुसार, फोनची डिझाईन Reno 9 Pro+ आणि OnePlus 11 वर आधारित आहे. म्हणजेच फोनसोबत IR ब्लास्टर आणि अलर्ट स्लायडर दिला जाऊ शकतो. लीकनुसार, फोनला 120Hz फुल एचडी प्लस 1.5k कर्व AMOLED PWM डिस्प्ले पॅनल मिळेल. 

त्याबरोबरच, फोन Snapdragon 8 Plus Gen 1 प्रोसेसर आणि LPDDR5 रॅमने सुसज्ज असेल, असे सांगितले जात आहे. फोनला 50-मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा मिळेल, जो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह येईल. फोनसोबत 5000 mAh बॅटरी आणि 100 W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे.

OnePlus 11R ची संभाव्य किंमत

OnePlus 11R ही OnePlus 10R ची अपग्रेडेड वर्जन म्हणून सादर केली जाईल. हा फोन एप्रिल 2022 मध्ये 150W चार्जिंगसह लाँच झाला होता. हा फोन भारतात दोन एडिशनमध्ये सादर करण्यात आला होता, ज्यामध्ये एक एन्ड्युरन्स एडिशन 150W सुपर VOOC फास्ट चार्जिंगसह येतो, तर दुसरा 80W सुपर VOOC फास्ट चार्जिंगसह येतो. फोनची सुरुवातीची किंमत 38,999 रुपये ठेवण्यात आली होती. असा दावा केला जात आहे की, नवीन OnePlus 11R देखील त्याच किंमतीत लॉन्च केला जाऊ शकतो.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :