आगामी Amazon GIF सेलमध्ये OnePlusच्या ‘या’ महागड्या स्मार्टफोनवर मिळेल प्रचंड Discount, बघा डिल। Tech News 

आगामी Amazon GIF सेलमध्ये OnePlusच्या ‘या’ महागड्या स्मार्टफोनवर मिळेल प्रचंड Discount, बघा डिल। Tech News 
HIGHLIGHTS

OnePlus 11R वर Amazon सेलदरम्यान प्रचंड सूट मिळणार आहे.

हा स्मार्टफोन आगामी सेलमध्ये 34,999 रुपयांच्या प्रभावी किमतीत उपलब्ध होईल.

ग्राहकांना SBI बँक कार्डद्वारे 2000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळेल.

Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरू होण्यासाठी फक्त तीन दिवस उरले आहेत. त्याआधीच, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने अनेक 5G फोनवरील बहुतेक डिल्स उघड केल्या आहेत. या यादीमध्ये फ्लॅगशिप किलर ‘Oneplus’ च्या स्मार्टफोनचा देखील समावेश आहे. या ब्रँडचे फोन भारतात अधिक लोकप्रिय आहेत. चला तर मग बघुयात Oneplus 11R महागड्या स्मार्टफोनवर सेलदरम्यान कोणत्या आकर्षक सवलती देण्यात येणार आहेत.

आम्ही, अलीकडेच लाँच झालेल्या OnePlus 11R बद्दल बोलत आहोत. होय, OnePlus 11R वर Amazon सेलदरम्यान प्रचंड सूट मिळणार आहे. Amazon च्या सेल पेजवरून समोर आले आहे की, हा स्मार्टफोन आगामी सेलमध्ये 34,999 रुपयांच्या प्रभावी किमतीत उपलब्ध होईल. चला तर मग फार वेळ न घालवता बघुयात डील.

OnePlus 11R वरील डील

ONEPLUS 11R
ONEPLUS 11R

Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल दरम्यान, OnePlus 11R स्मार्टफोन 39,999 रुपयांच्या किंमतीत सूचीबद्ध केला जाईल. परंतु यासह 3000 रुपयांचे डिस्काउंट कूपन देखील उपलब्ध असेल. या कूपनसह डिव्हाइसची किंमत 36,999 रुपये कमी होईल. एवढेच नाही, तर ग्राहकांना SBI बँक कार्डद्वारे 2000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळेल, ज्यामुळे किंमत प्रभावीपणे 34,999 रुपयांपर्यंत खाली येईल.

OnePlus 11R

OnePlus 11R मध्ये 120 Hz रिफ्रेश रेटसह 6.74 इंच लांबीचा Super Fluid AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटसह सुसज्ज आहे. Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 उत्कृष्ट मल्टीटास्किंग आणि गेमिंग ऑफर करते. ज्यांना जरा कमी किमतीत फ्लॅगशिप परफॉर्मन्ससह स्मार्टफोन हवा आहे, ते OnePlus 11R खरेदी करू शकतात. याशिवाय, यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.

त्याबरोबरच, फोनमध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 5000mAh बॅटरीसह येतो. या फोनसोबत बॉक्समध्ये चार्जर देखील उपलब्ध आहे. विक्रीदरम्यान तो ज्या किंमतीला विकला जाईल त्यापेक्षा त्याच्या कॅमेराची कार्यक्षमता चांगली आहे. फोनमध्ये OIS सपोर्टसह 50MP मेन कॅमेरा देण्यात आला आहे. त्याबरोबरच, 8MP अल्ट्रा वाईड आणि 2MP मॅक्रो लेन्स LED फ्लॅशसह उपलब्ध आहे. आकर्ष सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी तुम्हाला 16MP फ्रंट कॅमेरा मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo