फ्लॅगशिप किलर OnePlus ने OnePlus 11R 5G भारतात गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मिड रेंज प्रीमियम 5G ऑफर म्हणून लाँच करण्यात आला होता. त्यानंतर, OnePlus ने आता देशात या हँडसेटच्या किमतीत मोठी कपात केली आहे. याशिवाय, ग्राहकांना किंमत आणखी कमी करण्यासाठी बँक सवलत देखील ऑफर केली जात आहे. येथे अतिरिक्त एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहेत. चला तर मग जाणून घेऊयात लोकप्रिय OnePlus 11R 5G ची नवी किंमत-
हे सुद्धा वाचा: POCO X6 Neo च्या भारतीय लाँचची पुष्टी! Affordable रेंजमध्ये आगामी फोनची होणार दाखल। Tech News
OnePlus कंपनीने OnePlus 11R 5G स्मार्टफोनची किंमत 3000 रुपयांनी कमी केली आहे. पूर्वी हँडसेटचा 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 39,999 रुपयांना उपलब्ध होता. तर, 16GB RAM + 256GB स्टोरेज मॉडेलची लॉन्च किंमत 44,999 रुपये होती. मात्र, आता 2000 आणि 3000 रुपयांच्या किमतीत कपात केल्यानंतर फोनच्या किमती अनुक्रमे 37,999 आणि 41,999 रुपये इतक्या झाल्या आहेत.
याव्यतिरिक्त, फोनवर काही ऑफर्सदेखील उपलब्ध आहेत. कंपनी ICICI बँक आणि OneCard क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या खरेदी आणि EMI व्यवहारांवर 1000 रुपयांची सूट देत आहे. तसेच, EMI 4,334 रुपये प्रति महिना पासून सुरू होतो. एवढेच नाही तर, Amazon प्लॅटफॉर्म Amazon Pay ICICI क्रेडिट कार्डसह 2500 रुपयांचे वेलकम रिवॉर्ड्स देत आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, नवीन किंमत Amazon आणि OnePlus India दोन्ही वेबसाइटवर पाहिली जाऊ शकते. हे उपकरण गॅलेक्टिक सिल्व्हर, सोनिक ब्लॅक आणि सोलर रेड कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.
OnePlus 11R स्मार्टफोनमध्ये 6.74-इंच लांबीचा फुल HD+ कर्व AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz ॲडॉप्टिव्ह डायनॅमिक रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. परफॉर्मन्ससाठी, फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जनरल 1 चिपसेटसह सुसज्ज आहे. त्याबरोबरच, यात ट्रिपल रियर कॅमेरा युनिट आहे. ज्यामध्ये 50MP Sony IMX890 प्रायमरी सेन्सर, 8MP अल्ट्रा-वाइड-एंगल सेन्सर आणि 2MP मॅक्रो कॅमेरा समाविष्ट आहे. याव्यतिरिक्त, एक 16MP सेल्फी शूटर देखील समोर उपलब्ध आहे. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.