OnePlus ने आपला OnePlus 11 स्मार्टफोन भारतात नवीन अवतारासह लाँच केला आहे. या हँडसेटचे नाव OnePlus 11 Marble Odyssey Limited-Edition आहे. हा हँडसेट कंपनीच्या फ्लॅगशिप OnePlus 11 ची विशेष आवृत्ती आहे. ही आवृत्ती मर्यादित काळासाठी उपलब्ध असणार आहे. बघुयात नव्या फोनची किंमत, फीचर्स आणि स्पेक्स –
OnePlus चा हा स्मार्टफोन एकाच व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. म्हणजेच यात 16GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध असतील, ज्याची किंमत 64,999 रुपये आहे. नव्या स्मार्टफोनची विक्री 6 जून रोजी दुपारी 12 वाजतापासून सुरु होणार आहे.
https://twitter.com/stufflistings/status/1661567287810244608?ref_src=twsrc%5Etfw
या OnePlus मोबाईलमध्ये 6.7-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले वापरण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. या हँडसेटमधील सर्व स्पेसिफिकेशन्स OnePlus 11 स्टँडर्ड प्रमाणेच आहेत. परंतु काही फरक देखील आहेत, ते बघुयात –
डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास, OnePlus 11 Marble Odyssey Edition येलो ब्राऊन रंगात येतो, जो गुरू ग्रहाच्या पृष्ठभागासारखा दिसतो. त्याबरोबरच, मागील पॅनलवर मार्बल फिनिशसह 3D मायक्रोक्रिस्टलाइन रॉक मटेरियल वापरणारा हा पहिला फोन आहे. OnePlus 11 प्रमाणे, यात देखील स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर आहे. हा फोन Android 13 वर काम करेल आणि स्पेशल एडिशनला 5 वर्षांचा OS सपोर्ट देखील मिळणार आहे.
OnePlus 11 Marble Odyssey Edition च्या मागील पॅनल वर तीन कॅमेरे आहेत. यात 50MP Sony IMX890 मेन कॅमेरा, 48MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 32MP टेलिफोटो कॅमेरा आहे. तसेच, 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देखील आहे. त्याबरोबरच, या मोबाईलमध्ये 5000mAh बॅटरी आणि 100W फास्ट चार्जर आहे.