नव्या अवतारात येतोय आकर्षक OnePlus 11 स्मार्टफोन, लाँचपूर्वीच किंमत लीक
OnePlus 11 Marble Odyssey स्पेशल एडिशन भारतासाठी जाहीर
फोनसह तुम्हाला OnePlus Buds Z2 मोफत मिळतील.
लाँच पूर्वीच OnePlus 11 Marble Odyssey स्पेशल एडिशनची किमंत लीक
OnePlus ने आपली OnePlus 11 Marble Odyssey स्पेशल एडिशन भारतासाठी जाहीर केली आहे. हा स्मार्टफोन आधीच Eternal Green आणि Titan Black व्हेरियंटसह बाजारात दिसणार आहे. ONEPLUS चे फोन्स आधीच्या भारतीय ग्राहकांच्या मनावर राज्य करतात. त्यात, आता हा फोन एका वेगळ्या फिनिशसह लोकांची मने जिंकण्यास सज्ज झाला आहे.
OnePlus 11च्या नव्या मॉडेलची किंमत लीक
OnePlus 11 Marble Odyssey ची किंमत लाँचपूर्वीच लीक झाली आहे. कंपनीने एका प्रकाशनात म्हटले आहे की, मार्बल ओडिसी आवृत्तीमुळे टेक्नॉलॉजी आणि आर्ट यांच्यातील अंतर मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. कंपनीने पुढे असेही म्हटले की, या क्षेत्रातील लोक हा फोन खरेदी करण्यासाठी पुढे येऊ शकतात.
हा फोन लॉन्च होण्याआधीच मुकुल शर्मा या ट्विटर यूजरने त्याच्या किंमतीबद्दल ट्विट करून माहिती दिली होती की, हा फोन 64,999 रुपये किंमतीत लाँच केला जाऊ शकतो. या फोनसह तुम्हाला OnePlus Buds Z2 मोफत मिळणार आहे.
OnePlus 11 5G Marble Odyssey Special Variant: ₹64,999 (16GB/256GB). Free Buds Z2 alongside.#OnePlus #OnePlus11 pic.twitter.com/aiqzzgvHwX
— Mukul Sharma (@stufflistings) May 25, 2023
नवीन मॉडेल 'या' स्पेक्ससह येण्याची शक्यता
OnePlus 11 5G Marble Odyssey स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर मिळत आहे. यामध्ये कंपनी हॅसलब्लॅड कॅमेरा वापरणार आहे. OnePlus 11 च्या नवीन मॉडेलमध्ये तुम्हाला 5000mAh बॅटरी मिळणार आहे, जी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. हे फक्त 16GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह ऑफर केले जाऊ शकते.
फोनच्या मागील बाजूस एक 50MP Sony IMX890 कॅमेरा असेल, त्यात 48MP Sony IMX581 अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये तुम्हाला 32MP पोर्ट्रेट कॅमेरा देखील मिळू शकतो. फोनच्या पुढील बाजूस 16MP सेल्फी कॅमेरा असेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile