digit zero1 awards

OnePlus चे हे तीन नवीन उपकरण भारतात ‘या’ किमतीत येणार, 7 फेब्रुवारीला उठेल पडदा

OnePlus चे हे तीन नवीन उपकरण भारतात ‘या’ किमतीत येणार, 7 फेब्रुवारीला उठेल पडदा
HIGHLIGHTS

OnePlus 11 भारतात 7 फेब्रुवारी रोजी लॉन्च होईल.

OnePlus 11 भारतात 54,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीला येईल

बड्स प्रो 2 आणि कीबोर्ड देखील लॉन्च केले जातील.

OnePlus 11ला चीनच्या युजर्सची पसंती मिळत आहे. OnePlus 11 हँडसेट 7 फेब्रुवारीला लाँच होईल. OnePlus 11 च्या आंतरराष्ट्रीय लाँचला अजून काही आठवडे बाकी असताना, एका नवीन अहवालाने भारतात त्याची किंमत उघड केली आहे. आगामी OnePlus Buds Pro 2 आणि OnePlus Keyboard च्या किमती देखील समोर आल्या आहेत.

हे सुद्धा वाचा : Airtel यूजर्ससाठी खुशखबर! आता या 3 प्लॅनमध्ये मिळेल Disney + Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन

प्राइसबाबाच्या एका नवीन अहवालात दावा केला आहे की, OnePlus 11 ची 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 54,999 रुपये असेल, तर 16GB+256GB आणि 16GB+512GB व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे 59,999 आणि 66999 रुपये असेल. मागील वर्षी OnePlus 10 Pro भारतात सुरुवातीच्या किंमतीला 66,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता.

शिवाय, अहवाल आगामी OnePlus Buds Pro 2 आणि OnePlus कीबोर्डच्या किंमती प्रकट करतो. ब्रँडच्या पहिल्या कीबोर्डची किंमत 9,999 रुपये असेल. सूत्रांनी प्राइसबाबाला सांगितले की, रेड केबल क्लबच्या सदस्यांना प्री-ऑर्डरवर कीबोर्डवर विशेष सवलत मिळेल, तर दुसऱ्या पिढीतील OnePlus Buds Pro 2 ची किंमत भारतीय ग्राहकांसाठी 11,999 रुपये असू शकते.

नमूद केल्याप्रमाणे, OnePlus 11 भारतात 7 फेब्रुवारी रोजी लॉन्च होईल. यासोबतच OnePlus Buds Pro 2 आणि OnePlus कीबोर्ड देखील सादर केले जातील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo