Oneplus 10 Pro च्या तुलनेत Oneplus 11 5G मध्ये किती बदल झाला ? वाचा डिटेल्स
Oneplus 10 Pro VS Oneplus 11 5G
जुन्या फ्लॅगशिप मॉडेलपेक्षा नवीन मॉडेलमध्ये झालेला बदल
जुन्या फ्लॅगशिप मॉडेलपेक्षा नवीन मॉडेलची किंमत कमी
OnePlus ने 7 फेब्रुवारी रोजी भारतात अनेक गॅजेट्स लॉन्च केले, त्यापैकी एक OnePlus 11 5G होता. OnePlus 11 5G ची सुरुवातीची किंमत 56,999 रुपये आहे. या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, मागील फ्लॅगशिप फोन म्हणजेच OnePlus 10 Pro 5G च्या तुलनेत OnePlus 11 5G किती अपग्रेड केले गेले आहे…
हे सुद्धा वाचा : अडथड्याशिवाय बघा चित्रपट आणि वेब सिरीज, Amazon Prime Video आणि Hotstar सब्सक्रिप्शन मोफत
किंमत :
नवीन स्मार्टफोनची किंमत म्हणजेच OnePlus 11 5G ची 8GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 56,999 रुपये आहे. तर, OnePlus 10 Pro च्या त्याच व्हेरिएंटची किंमत 60,999 रुपये आहे. लॉन्चच्या वेळी या फोनची किंमत 66,999 रुपये होती. म्हणजेच नवीन मॉडेल जुन्या मॉडेलपेक्षा स्वस्तात लाँच करण्यात आले आहे.
डिस्प्ले :
OnePlus 11 5G मध्ये तुम्हाला 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळेल जो 120hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तुम्हाला जुन्या फ्लॅगशिप फोनमध्ये म्हणजे OnePlus 10 Pro 5G मध्ये अगदी हाच डिस्प्ले मिळत असे. म्हणजेच डिस्प्लेच्या बाबतीत नवीन स्मार्टफोनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
सॉफ्टवेअर :
ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर OnePlus 11 5G मध्ये oxygen os 13 चा सपोर्ट देण्यात आला आहे. तर, 10 pro 5G मध्ये तुम्हाला ऑक्सिजन 12 आउट ऑफ द बॉक्स देण्यात आला आहे. मात्र, आता ग्राहक ऑक्सिजन 13 वर देखील अपडेट करू शकतात. OnePlus 11 5G मध्ये, कंपनी 5 वर्षांसाठी सुरक्षा अपडेट्स आणि 4 वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट्स प्रदान करेल. जुन्या मॉडेलच्या बाबतीत असे नव्हते.
कॅमेरा :
तुम्हाला OnePlus 11 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप पाहायला मिळेल. ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा मेन कॅमेरा, 48-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड आणि 32-मेगापिक्सलचा टेलीफोटो 2X झूम लेन्स आहे. यामध्ये समोर 16-मेगापिक्सेल कॅमेरा आहे,
OnePlus 10 Pro 5G 48-मेगापिक्सेल मुख्य सेन्सर, 50-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड आणि 3.3x झूमसह 8-मेगापिक्सेल टेलिफोटोसह आला आहे. तसेच, तुम्हाला 32-मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल.
प्रोसेसर :
OnePlus 11 5G मध्ये तुम्हाला Snapdragon 8 Generation 2 प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो तर OnePlus 10 pro 5G मध्ये Snapdragon 8 Generation 1 प्रोसेसर उपलब्ध होता. म्हणजेच, प्रोसेसरच्या बाबतीत, OnePlus 11 5G बदलला आहे. नवीन मॉडेलमध्ये रॅम आणि स्टोरेजमध्येही वाढ करण्यात आली आहे. OnePlus 11 5G मध्ये कंपनीने 16 GB रॅम आणि 256 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज दिले आहे. 10 प्रो 5G मध्ये 12GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज उपलब्ध होते.
बॅटरी
दोन्ही स्मार्टफोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी मिळते, परंतु OnePlus 5G मध्ये तुम्हाला 100 W SuperVooc चार्जिंग देण्यात आले आहे. तर, OnePlus 10 Pro मध्ये 80 W SuperVooc चार्जिंग देण्यात आले आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile