OnePlus युजर्ससाठी Good News! ‘या’ लोकप्रिय सिरीजमध्ये आजपासून मिळेल Android 14 अपडेट, काय मिळेल विशेष? Tech News 

OnePlus युजर्ससाठी Good News! ‘या’ लोकप्रिय सिरीजमध्ये आजपासून मिळेल Android 14 अपडेट, काय मिळेल विशेष? Tech News 
HIGHLIGHTS

OnePlus 11 वर Android 14 आधारित OxygenOS 14 चे अपडेट सादर केले आहे.

हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे.

फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे, जी 100W सुपरवुक फास्ट चार्जिंग सपोर्टसह आहे.

सर्वांना माहितीच आहे की, Android 14 अखेर रोल आउट केले गेले आहे आणि जवळजवळ सर्व Android युजर्स देखील ही नवीनतम ऑपरेटिंग सिस्टम कधी वापरता येईल, याची आतुरतेने वाट पाहत आहेत. फ्लॅगशिप किलर OnePlus ने आपल्या वापरकर्त्यांची ही इच्छा पूर्ण करत, फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 11 वर Android 14 आधारित OxygenOS 14 चे अपडेट सादर केले आहे. आजपासूनच, OnePlus 11 युजर्स नवीन OS चा लाभ घेऊ शकतील.

हे सुद्धा वाचा: WhatsApp वर आले Important फिचर! आता नव्या बटनसह जुने चॅट्स शोधणे होईल अधिक सोपे, वाचा डिटेल्स। Tech News

Android 14 अपडेट

Android 14 ने Google Pixel फोनसह बाजारात प्रवेश केला. आता वनप्लसचे स्मार्टफोन्सही या नव्या अपडेट्ससह सुसज्ज आहेत. भारतीय वापरकर्त्यांसाठी हे फायदेशीर आहे की, कंपनीने OnePlus 11 साठी नवीनतम अपडेट भारतात देखील आणण्यास सुरुवात केली आहे. OnePlus चा हा लेटेस्ट फोन चालवणाऱ्या लोकांना स्थिर Android 14 आधारित OxygenOS 14 अपडेट मिळू लागले आहे. जे फोनवर डाउनलोड आणि इन्स्टॉल केले जाऊ शकते. कंपनी OnePlus 11R वर Android 14 आणि Oxygen OS 14 देखील आणत आहे.

OnePlus 11 5G Specification Price in India
OnePlus 11 5G Specification Price in India

OnePlus 11 फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

OnePlus 11 5G फोन 6.7-इंच लांबीचा क्वाड HD+ डिस्प्लेसह सादर केला गेला आहे. या स्क्रीनला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टसचे संरक्षण आहे. हा फोन स्क्रीन NTPO सुपर फ्लुइड AMOLED पॅनेलवर बनवला आहे आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.

फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. 50MP Sony IMX890 प्रायमरी सेन्सर प्रदान केला आहे, जो 48MP Sony IMX581 अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 32MP Sony IMX709 पोर्ट्रेट टेली लेन्ससह कार्य करतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी OnePlus 11 5G फोनच्या फ्रंट पॅनलवर 16MP Sony IMX471 सेन्सर प्रदान केला आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 100W सुपरवुक फास्ट चार्जिंग सपोर्टसह आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo