Price Cut! 50MP प्रायमरी कॅमेरासह OnePlus 11 5G फोनच्या किमतीत पुन्हा एकदा घट, नवी किंमत साईटवर Live। Tech News

Updated on 16-Apr-2024
HIGHLIGHTS

OnePlus 11 5G फोनच्या किमतीत पुन्हा एकदा घट

कंपनीने फोनची किंमत 3000 रुपयांनी कमी केली आहे.

नवीन किंमत कंपनीच्या साइटवर लाईव्ह करण्यात आली आहे.

फ्लॅगशिप किलरचा लोकप्रिय स्मार्टफोन OnePlus 11 5G फोनच्या किमतीत पुन्हा एकदा घट करण्यात आली आहे. कंपनीने हा फोन मागील वर्षी लाँच करण्यात आला होता. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीची नवी सिरीज OnePlus 12 फोन या वर्षाच्या सुरुवातीला लाँच केली गेली. OnePlus 12 फोन लॉन्च झाल्यापासून या फोनच्या किंमतीतील ही दुसरी कपात आहे. होय, काही काळापूर्वी कंपनीने फोनची किंमत 2000 रुपयांनी कमी केली होती. OnePlus 11 5G फोन अगदी पॉवरफुल फीचर्ससह येतो.

हे सुद्धा वाचा: Latest Realme Pad 2 जबरदस्त डिस्प्लेसह अखेर भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि सर्व फीचर्स। Tech News

OnePlus 11 5G ची भारतीय किंमत

OnePlus ने OnePlus 11 5G फोन 56,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केला आहे. ही किंमत फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटसाठी आहे. वर सांगितल्याप्रमाणे, कंपनीने काही काळापूर्वी फोनची किंमत 2000 रुपयांनी कमी केली होती, त्यानंतर तो 54,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध होता. मात्र, फोनच्या किमतीत आता पुन्हा एकदा कपात करण्यात आली आहे. कंपनीने फोनची किंमत 3000 रुपयांनी कमी केली आहे. आता तुम्ही हा फोन 51,999 रुपयांना खरेदी करू शकता. नवीन किंमत कंपनीच्या साइटवर लाईव्ह करण्यात आली आहे.

OnePlus 11 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

OnePlus 11 5G फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा क्वाड HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 120Hz इतका आहे. याशिवाय, हा फोन सुरळीत कामकाजासाठी Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, फोन 16GB रॅम पर्यंत सपोर्ट करतो.

oneplus 11r price cut

फोटोग्राफीसाठी OnePlus 11 5G फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50MP Sony IMX890 प्रायमरी सेन्सर, 48MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 32MP RGBW टेलिफोटो सेन्सर आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा आहे. त्याबरोबरच, फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनमध्ये अवघ्या 25 मिनिटांत पूर्ण चार्ज होण्याची क्षमता असल्याचा कंपनीचा दावा आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :