OnePlus 11 5G स्मार्टफोनच्या किमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. स्मार्टफोन गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये लाँच झाला होता. या वर्षी नुकतेच OnePlus 12 5G देखील भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. यानंतर आता कंपनीने OnePlus 11 5G फोन स्वस्त केला आहे. नवीन किंमत जाणून घेण्यापूर्वी फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा आहे. चला तर मग जाणून घेऊयात OnePlus 11 5G फोनची नवी किंमत-
वर सांगितल्याप्रमाणे, OnePlus 11 5G फोनच्या किमतीत 2000 रुपयांची घट करण्यात आली आहे. फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत आधी 56,999 रुपये होती. कपातीनंतर, हा फोन तुम्ही 54,999 रुपयांना खरेदी करू शकता. फोनची नवीन किंमत कंपनीच्या अधिकृत साइटवर लाइव्ह करण्यात आली आहे. हा फोन टायटन ब्लॅक आणि इटरनल ग्रीन कलर ऑप्शन्ससह खरेदीसाठी उपलब्ध आहे.
OnePlus 11 5G स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा क्वाड HD+ डिस्प्ले आहे, या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. याशिवाय, हा फोन सुरळीत कामकाजासाठी Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Snapdragon 8 Gen 2 मोबाइल प्लॅटफॉर्म खरोखरच विलक्षण अनुभव सक्षम करण्यासाठी संपूर्ण बोर्डवर ग्राउंडब्रेकिंग AI सह हुशारीने इंजिनिअर करण्यात आले आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळणार आहे.
याव्यतिरीक्त, फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP प्राथमिक कॅमेरा, 48MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 32MP टेलिफोटो कॅमेरा आहे. तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा आहे. त्याबरोबरच फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. हा फोन फक्त 25 मिनिटांत पूर्ण चार्ज होतो, असा दावा कंपनीने केला आहे.