50MP कॅमेरा आणि 100W चार्जिंगसह येणारा नवीन OnePlus फोन, मिळेल 2K डिस्प्ले

Updated on 18-Oct-2022
HIGHLIGHTS

कंपनी OnePlus 11 नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत

कंपनी OnePlus 11 मध्ये प्रो वेरिएंटसह फीचर्स देऊ शकते.

कंपनी 2022 च्या शेवटी OnePlus 11 Pro लाँच करणार

OnePlus सध्या आपला नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या या नवीन फोनचे नाव OnePlus 11 आहे. काही दिवसांपूर्वी, रिपोर्ट्समध्ये असे म्हटले होते की कंपनी 2022 च्या शेवटी OnePlus 11 Pro लाँच करणार आहे. आता एक नवीन अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की कंपनी प्रो मॉडेलऐवजी Vanilla OnePlus 11 लाँच करणार आहे.

हे सुद्धा वाचा : 'द काश्मीर फाइल्स 2' ची प्रतीक्षा अखेर संपणार आहे, विवेक अग्निहोत्रीकडून रिलीज डेट जाहीर

 गेल्या महिन्यात, Smartprix ने OnePlus 11 Pro चे CAD रेंडर शेअर केले. या रेंडरमध्ये दाखवलेलय फोनमध्ये कर्व एज डिस्प्ले आणि मध्यभागी पंच-होल होता. दरम्यान, डिजिटल चॅट स्टेशनने आपल्या अहवालात दावा केला आहे की, स्मार्टप्रिक्सच्या रेंडरमध्ये दाखवलेला फोन हा आणखी एक उपकरण आहे, जो सेंटर पंच-होलसह येईल. यासोबतच डिजिटल चॅट स्टेशनने OnePlus 11 च्या काही खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहितीही शेअर केली आहे.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

टिपस्टरनुसार कंपनी या फोनमध्ये 3216×1440 पिक्सेल रिझोल्यूशनसह एक उत्कृष्ट 2K डिस्प्ले देणार आहे. या डिस्प्लेला कर्व एज असेल आणि वरच्या-डाव्या बाजूला एक पंच-होल दिसेल. फोटोग्राफीसाठी कंपनी या फोनमध्ये LED फ्लॅशसह तीन कॅमेरे देणार आहे. यात 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 32-मेगापिक्सेल टेलिफोटो सेन्सरसह 48-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्सचा समावेश आहे, अशी माहिती मिळाली आहे. 

OnePlus 11 16 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज वेरिएंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. हा फोन 5000mAh बॅटरीसह येऊ शकतो. फोनमध्ये दिलेली ही बॅटरी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. OnePlus चा हा आगामी फोन Android 13 वर आधारित OxygenOS 13 वर काम करेल.

असे मानले जाते की, कंपनी OnePlus 11 मध्ये प्रो वेरिएंटसह फीचर्स देऊ शकते. अफवांनुसार, कंपनी फोनच्या प्रो वेरिएंटमध्ये 6.7-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देऊ शकते, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. याशिवाय फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळण्याची शक्यता आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :