50MP कॅमेरासह येणाऱ्या OnePlus 11 5G वर प्रचंड Discount उपलब्ध, ‘येथे’ मिळतेय Best ऑफर

50MP कॅमेरासह येणाऱ्या OnePlus 11 5G वर प्रचंड Discount उपलब्ध, ‘येथे’ मिळतेय Best ऑफर
HIGHLIGHTS

OnePlus 11 5G वर अप्रतिम ऑफर्स मिळत आहेत.

ICICI बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यावर मोठी सूट उपलब्ध

या 5G फोनमध्ये 100W SUPERVOOC चार्जिंग सपोर्टसह बॅटरी उपलब्ध

OnePlus ने अलीकडेच जानेवारी महिन्यात आपली लेटेस्ट स्मार्टफोन सिरीज OnePlus 12 सिरीज लाँच केली होती. या सिरीजअंतगर्त कंपनीने दोन OnePlus 12 आणि OnePlus 12R स्मार्टफोन लाँच केले आहेत. नवे स्मार्टफोन लाँच होताच कंपनी जुन्या मॉडेल्सवर ऑफर्स देत आहे. होय, Amazon वर लोकप्रिय OnePlus 11 5G वर अप्रतिम ऑफर्स मिळत आहेत. हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर हीच योग्य वेळ आहे. बघुयात ऑफर्स-

OnePlus 11 5G ची किंमत आणि ऑफर्स

OnePlus 11 5G स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 56,999 रुपये आहे. तर, फोनच्या टॉप वेरिएंटची किंमत 61,999 रुपये आहे. Amazon वर या स्मार्टफोनवर अनेक सवलती देण्यात येत आहेत. Amazon वरून OnePlus 11 5G स्मार्टफोन खरेदी केल्यास 3000 रुपयांची झटपट सूट उपलब्ध आहे. लक्षात घ्या, ही ऑफर फक्त ICICI बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यावर उपलब्ध असेल. तसेच, यावर 27 हजार रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. OnePlus 11 5G स्मार्टफोन टायटन ब्लॅक आणि इटरनल ग्रीन या दोन कलर ऑप्शन्समध्ये येतो. येथून खरेदी करा

OnePlus 11 5G Amazon
OnePlus 11 5G Amazon

OnePlus 11 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

OnePlus 11 5G स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा AMOLED QHD डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120hz आहे. तसेच, स्क्रीन प्रोटेक्शन्ससाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस देखील उपलब्ध आहे. स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर आहे. त्याबरोबरच, OnePlus चा हा फोन Android 13 वर आधारित OxygenOS वर चालतो. स्टोरेज सेक्शनमध्ये OnePlus 11 5G दोन व्हेरिएंटमध्ये येतो. बेस व्हेरिएंटमध्ये 8GB रॅमसह 128GB अंतर्गत स्टोरेज आहे. तर, टॉप वेरिएंट 16GB रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेजसह येतो.

फोटोग्राफीसाठी, फोनच्या मागील बाजूस 50MP मेन कॅमेरा, 48MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 32MP टेलिफोटो लेन्स आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर 16MP कॅमेरा देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, या 5G फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 100W SUPERVOOC चार्जिंग सपोर्टसह येते. हा फोन 25 मिनिटांत फोन 1 ते 100 टक्के चार्ज होतो. चार्जिंगसाठी USB Type-C पोर्ट उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo