OnePlus 10T 3 ऑगस्ट रोजी होणार लाँच, मिळणार 150W फास्ट चार्जिंगसह अनेक उत्तम फीचर्स
OnePlus 10T स्मार्टफोन 150W फास्ट चार्जिंगसह येईल
नवीन स्मार्टफोन 3 ऑगस्ट रोजी लाँच होणार असल्याचे वृत्त
नव्या फोनमध्ये 50 MP प्रायमरी कॅमेरा मिळेल
OnePlus Ace Pro लाँच करण्याची तारीख 3 ऑगस्ट रोजी चीनमध्ये सेट करण्यात आली आहे. हाच स्मार्टफोन भारत आणि जागतिक बाजारपेठेत OnePlus 10T 5G म्हणून लाँच केला जाईल. अधिकृत लाँचआधी, कंपनीने Weibo वर OnePlus Ace Pro च्या फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाचे तपशील शेअर केले आहेत. चार्जिंग स्पीड व्यतिरिक्त, ब्रँडने यापूर्वी OnePlus Ace Pro मध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen1 SoC आणि 16GB LPDDR5 रॅम असेल, याबाबत खुलासा केला होता. त्याच्या सेगमेंटमध्ये तब्बल 16GB RAM सह, OnePlus Ace Pro हा एवढ्या रॅमसह येणारा पहिला OnePlus हँडसेट आहे.
हे सुद्धा वाचा : August OTT Release : संपूर्ण महिना असेल मनोरंजनाने भरपूर, हे चित्रपट आणि सिरीज OTTवर होतील रिलीज
भारतासाठी, OnePlus Ace Pro OnePlus 10T moniker सह येईल. हा OnePlus Ace Pro प्रमाणेच लोडआउट पॅक करेल. डिव्हाइस Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 SoC, 150W फास्ट चार्जिंग आणि 16GB LPDDR5 रॅमने सुसज्ज असेल. मात्र, आपल्याला OnePlus 10T/OnePlus Ace Pro वर अलर्ट स्लाइडर दिसणार नाही.
OnePlus Ace Pro च्या चार्जिंग तंत्रज्ञानाची बातमी टिपस्टर मुकुल शर्माद्वारे चर्चेत आली होती. टीझरद्वारे, OnePlus Ace Pro 150W जलद चार्जिंगला सपोर्ट करेल याची पुष्टी झाली आहे. OnePlus चीनमध्ये OnePlus Ace Pro आणि भारतात OnePlus 10T 3 ऑगस्ट रोजी लाँच करेल.
OnePlus Ace Pro 16GB रॅम आणि 512GB स्टोरेजसह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 सोबत येतो. 150W जलद चार्जिंग सपोर्ट असलेली 4,800mAh बॅटरी फोनला पॉवर देईल. मागील लीक्सवरून असे दिसून आले आहे की, OnePlus Ace Pro मध्ये 6.78-इंच फुल-HD+ AMOLED पॅनेल आहे. जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी, 50MP प्राइमरी, 8MP अल्ट्रा-वाइड आणि 2MP मॅक्रो सेटअपसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये फ्रंटला 32MP सेल्फी शूटर देण्यात आला आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile