कंपनीकडून OnePLus 10T चे फीचर्स कन्फर्म, 50 MP कॅमेरासह मिळतील अनेक जबरदस्त फीचर्स

कंपनीकडून OnePLus 10T चे फीचर्स कन्फर्म, 50 MP कॅमेरासह मिळतील अनेक जबरदस्त फीचर्स
HIGHLIGHTS

OnePLus 10T च्या फीचर्सची कंपनीकडून पुष्टी

16GB पर्यंत LPDDR5 रॅम ऑफर करणारा पहिला ONEPLUS स्मार्टफोन

फोनमध्ये 4800mAh बॅटरी उपलब्ध

OnePlus आपला नवीन हँडसेट – OnePlus Ace Pro चीनमध्ये 3 ऑगस्ट म्हणजेच बुधवारी लाँच करणार आहे. 3 ऑगस्ट रोजी या हँडसेटची एंट्री भारतासह इतर बाजारपेठांमध्येही होईल. चीनच्या बाहेर हा स्मार्टफोन OnePlus 10T नावाने लाँच केला जाईल. नुकत्याच झालेल्या लीक्समध्ये आगामी डिवाइसच्या फीचर्सबद्दल बरीच माहिती समोर आली आहे. दरम्यान, आता कंपनीने लाँचपूर्वी आपल्या खास फीचर्सवरून पडदा उचलला आहे. कंपनीने सांगितले की, हा फोन 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले, 150W चार्जिंग आणि 16GB पर्यंत RAM सह येईल. जाणून घेऊयात फीचर्स… 

हे सुद्धा वाचा : iPhone 12 आणि iPhone 13 झाले स्वस्त ! कुठे मिळतेय सर्वोत्तम डील, Flipkart की Amazon ? घ्या जाणून…

OnePlus Ace Pro चे अपेक्षित फीचर्स 

कंपनी या फोनमध्ये 6.7-इंच लांबीचा फुल HD + LPTP 2.0 AMOLED डिस्प्ले देणार आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि HDR10+ ला सपोर्ट करेल. फोनमध्ये दिलेला हा डिस्प्ले टॉप सेंटर पंच-होल आणि स्लिम बेझल्ससह येईल. कंपनी हा फोन ग्रीन आणि ब्लॅक कलर मध्ये लाँच करेल, अशी माहिती मिळाली आहे.

OnePlus चा हा पहिला स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये कंपनी 16GB पर्यंत LPDDR5 रॅम ऑफर करणार आहे. लीकनुसार, फोनमध्ये 512 GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेज दिले जाईल. या फोनमध्ये Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट मिळेल. फोटोग्राफीसाठी, फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह तीन कॅमेरे दिले जातील.

oneplus 10t

यामध्ये 50-मेगापिक्सेल सोनी IMX766 प्रायमरी सेन्सरसह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. फोनमध्ये देण्यात आलेल्या मेन कॅमेऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते OIS म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन फीचरला सपोर्ट करेल. याशिवाय, कंपनी मागील सेटअपमध्ये इमेज क्लॅरिटी इंजिन 2.0 देखील देण्याची शक्यता आहे.

सेल्फीसाठी, तुम्हाला या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. त्याबरोबरच, हा फोन 4800mAh बॅटरीसह येईल. ही बॅटरी 150W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. उत्तम गेमिंग एक्सपेरियन्ससाठी, GPA 3.0 सह फोनमध्ये HyperBoost गेमिंग इंजिन देखील दिले जाईल. हा फोन Android 12 वर आधारित नवीनतम ColorOS वर काम करेल. फोनची किंमत सुमारे 50 हजार रुपये असण्याची शक्यता आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo