OnePlus 10T 5G आज बाजारात लाँच होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा फोन संध्याकाळी 7.30 वाजता लाँच होईल, असे म्हटले जात आहे. बातम्यांनुसार, या फोनमध्ये Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट दिला जाऊ शकतो. तसेच, 6.7-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे. हा फोन मूनस्टोन ब्लॅक आणि जेड ग्रीन कलरमध्ये खरेदी करता येईल. याशिवाय OnePlus 10T 5G मध्ये आणखी अनेक फीचर्स दिले जाऊ शकतात.
हे सुद्धा वाचा : एका महिन्याच्या वैधतेसह AIRTEL चे चार स्वस्त प्लॅन्स , मिळेल भरपूर डेटा आणि अमर्यादित कॉलिंग
OnePlus 10T 5G न्यूयॉर्कमध्ये 10:00 ET म्हणजेच 7:30 IST वाजता लाईव्ह-स्ट्रीम केले जाईल. न्यूयॉर्क शहरातील गोथम हॉलमध्ये लाँच इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती मिळाली आहे. तुम्ही OnePlus च्या सोशल मीडिया हँडल किंवा YouTube पेजवर लाईव्ह स्ट्रीम बघू शकता.
OnePlus 10T 5G ची किंमत 40,000 ते 50,000 रुपये दरम्यान असण्याची शक्यता आहे. मात्र, हा केवळ अंदाज आहे. पण हा फोन जास्त किमतीत लाँच होणार आहे, असे वृत्त आहे.
यात 6.7-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले असेल. त्याचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. हा फोन Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटने सुसज्ज असेल. या डिवाइसमध्ये 4800mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. यामध्ये फास्ट चार्जिंग स्पीडही दिली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये OnePlus 10R प्रमाणे 150W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो. याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सिस्टम असेल. त्याचा पहिला सेन्सर 50 मेगापिक्सलचा Sony IMX 766 सेन्सर असेल, अशी माहिती मिळाली आहे.