19 मिनिटांत पूर्ण चार्ज होणारा OnePlus 10T 5G फोन लाँच, मिळतेय हजारो रुपयांची सूट…

Updated on 04-Aug-2022
HIGHLIGHTS

OnePlus 10T 5G स्मार्टफोन भारतात लाँच

फोनची सुरुवातीची किंमत 50 हजार रुपयांपेक्षा कमी

तसेच, कंपनीकडून ग्राहकांना स्मार्टफोनवर अनेक ऑफर्स मिळतील

OnePlus ने बुधवारी OnePlus 10T स्मार्टफोन भारतासह अनेक जागतिक बाजारपेठांमध्ये लाँच केला. भारतात फोनची सुरुवातीची किंमत 50 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. फोन एक पावरफुल स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 प्रोसेसर, 150W SUPERVOOC Endurance Edition वायर्ड चार्जिंगसह 4800mAh बॅटरी आणि 50-मेगापिक्सेल ट्रिपल रिअर कॅमेरासह येतो. हा स्मार्टफोन तीन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे, ज्यामध्ये टॉप-ऑफ-द-लाइन व्हेरिएंट 16GB RAM सह येतो. 

हे सुद्धा वाचा : Amazon Great Freedom Festival Sale 2022: मिळतील 'हे' सर्वोत्तम डिल्स

OnePlus 10T

फोन ड्युअल नॅनो सिम सपोर्टसह येतो आणि Android 12 वर आधारित OxygenOS 12.1 वर चालतो. यात लो टेम्परेचर पॉलीक्रिस्टलाइन ऑक्साईड (LTPO) टेक्नॉलॉजीवर आधारित 6.7-इंच लांबीचा फुल-HD + (1,080×2,412 पिक्सेल) फ्लुइड AMOLED डिस्प्ले आहे. डिस्प्लेला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन मिळते, यात 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट मिळेल. त्याबरोबरच, स्मार्टफोन ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 चिपसह 16GB पर्यंत LPDDR5 रॅमसह सुसज्ज आहे.

फोटोग्राफीसाठी, OnePlus 10T मध्ये ड्युअल-LED फ्लॅशसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात f/1.8 लेन्स आणि ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह 50-मेगापिक्सेल Sony IMX769 प्रायमरी सेन्सर आहे. कॅमेरा सेटअपमध्ये 119.9-डिग्री फील्ड-ऑफ-व्ह्यूसह f/2.2 लेन्ससह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड शूटर आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा देखील समाविष्ट आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी, OnePlus 10T मध्ये  फ्रंटला f/2.4 लेन्ससह 16-मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर आहे.

OnePlus 10T 256GB पर्यंत UFS 3.1 ड्युअल-लेन स्टोरेजसह येतो. कनेक्टिव्हिटी ऑप्शन्समध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth v5.3, GPS/ A-GPS, NFC आणि USB Type-C पोर्ट यांचा समावेश आहे. तसेच, यामध्ये बायोमेट्रिक सिक्युरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचरदेखील आहे. 

याव्यतिरिक्त, फोनमध्ये 4,800mAh ड्युअल-सेल बॅटरी आहे, जी 150W SuperVOOC Endurance Edition वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये बॉक्समध्ये 160W SuperVOOC पॉवर ऍडॉप्टर आहे. नवीन वायर्ड चार्जिंग टेक्नॉलॉजी 19 मिनिटांत 0 पासून 100 टक्के चार्ज होईल असा दावा करण्यात आला आहे.

OnePlus 10T ची किंमत

OnePlus 10T ची किंमत भारतात 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 49,999 रुपयांपासून सुरू होते. हा फोन 12GB रॅम + 256GB स्टोरेज मॉडेलमध्ये देखील येतो, ज्याची किंमत 54,999 रुपये आहे. 16GB रॅम + 256GB स्टोरेज वेरिएंट देखील आहे, ज्याची किंमत 55,999 रुपये आहे. OnePlus ने हा स्मार्टफोन जेड ग्रीन आणि मूनस्टोन ब्लॅक दोन कलर ऑप्शनमध्ये लाँच केला आहे. प्री-ऑर्डर आजपासून सुरू झाली असून, खुली विक्री 6 ऑगस्टपासून सुरू होईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

ऑफर्स :

वापरकर्ते OnePlus वेबसाइट, OnePlus स्टोअर्स आणि Amazon India वर ICICI बँक आणि SBI बँक कार्ड वापरून 5,000 रुपयांची सूट घेऊ शकतील. ग्राहक ICICI बँक कार्डवर 9 महिन्यांपर्यंतच्या नो कॉस्ट EMI चा देखील लाभ घेऊ शकतात. जुन्या Android किंवा iOS फोनची एक्सचेंज करणाऱ्या वापरकर्त्यांना 3,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळेल आणि जुन्या OnePlus वापरकर्त्यांना 5,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळेल. जे फोन प्री-ऑर्डर करतील त्यांना 1,000 रुपयांचा अतिरिक्त Amazon Pay कॅशबॅक देखील मिळेल. फोनच्या प्री-ऑर्डर लाईव्ह आहेत आणि 4 ऑगस्टपर्यंत सुरू राहतील.

OnePlus Store ऍपवर OnePlus 10T 5G खरेदी करणाऱ्या पहिल्या 1,000 ग्राहकांना मोफत OnePlus गेमिंग ट्रिगर जिंकण्याची संधी मिळेल. मात्र, ही ऑफर प्री-ऑर्डर ग्राहकांसाठी नाही आणि 6 ऑगस्ट 2022 पासून दुपारी 12:00 वाजता पासून लाईव्ह असेल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :