दिवाळीनिमित्त सर्वात मोठी ऑफर! OnePlus 5G फोनवर मिळतेय तब्बल 27,200 रुपयांपर्यंत सूट

Updated on 17-Oct-2022
HIGHLIGHTS

OnePlus 10R प्राइम ब्लू एडिशनवर 27,200 रुपयांपर्यंत सूट

Amazon India वर ही जबरदस्त ऑफर उपलब्ध

CITI, ICICI, Kotar Bank किंवा Rupay कार्डने व्यवहार केल्यास अतिरिक्त सूट मिळेल

OnePlus ने नुकताच OnePlus 10R 5G नवीन कलर ऑप्शनमध्ये सादर केला आहे. तो म्हणजे OnePlus 10R 5G  प्राइम ब्लू एडिशन होय. हा फोन बंपर डिस्काउंट आणि ऑफरसह तुमचा असू शकतो. Amazon India वर या फोनची 8 GB RAM + 128 GB इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 38,999 रुपयांच्या MRP वरून 32,999 रुपयांवर आली आहे. याशिवाय तुम्ही फोन खरेदी करण्यासाठी CITI, ICICI, Kotar Bank किंवा Rupay कार्डने व्यवहार करत असाल तर तुम्हाला 3 हजार रुपयांची सवलतही मिळेल. एक्सचेंज ऑफरमध्ये फोन घेऊन तुम्हाला हा फोन अधिक स्वस्तात पडणार आहे.

हे सुद्धा वाचा :  JIO, AIRTEL आणि VI ला टक्कर देण्यासाठी अदानी सज्ज, तुम्ही घ्याल का 'अदानी'चं सिम ?

जर तुम्हाला जुन्या फोनसाठी संपूर्ण एक्सचेंज रक्कम मिळाली, तर त्याची किंमत 15,200 रुपयांपर्यंत कमी होऊ शकते. विशेष बाब म्हणजे कंपनी निवडक मॉडेल्सच्या एक्सचेंजवर 3,000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील देत आहे. या सर्व ऑफरसह, फोनवर उपलब्ध एकूण सूट 27,200 रुपये होते. खरेदीसाठी क्लिक करा… 

कंपनी फोनमध्ये 6.7-इंच लांबीचा फ्लुइड OLED डिस्प्ले देत आहे. डिस्प्ले 120Hz च्या रीफ्रेश दर आणि 360Hz च्या टच सॅम्पलिंग रेटसह येतो. HDR10+ सपोर्टमुळे त्याच्या डिस्प्लेची कॉलिटी आणखी चांगली होते. फोन 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. प्रोसेसर म्हणून यामध्ये MediaTek डायमेंशन 8100 चिपसेट देण्यात आला आहे. 

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्ससह 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा समाविष्ट आहे. सेल्फीसाठी तुम्हाला यात 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा पाहायला मिळेल. फोन 5000mAh बॅटरीसह येतो, जो 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :