150W चार्जिंग, सर्वोत्तम कॅमेरा आणि डिस्प्लेसह OnePlus फोनचे नवीन वेरिएंट, मिळेल आकर्षक लुक

150W चार्जिंग, सर्वोत्तम कॅमेरा आणि डिस्प्लेसह OnePlus फोनचे नवीन वेरिएंट, मिळेल आकर्षक लुक
HIGHLIGHTS

OnePlus 10R प्राइम ब्लू एडिशन लवकरच येणार

नव्या वर्जनची मायक्रोसाइट Amazon India वर लाईव्ह

Amazon India च्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये त्याची विक्री होणार

OnePlus ने आपला नवीन 5G स्मार्टफोन OnePlus 10R या वर्षी एप्रिलमध्ये भारतात लाँच केला होता. सिएरा ब्लॅक आणि फॉरेस्ट ग्रीन कलर पर्यायांमध्ये येत असलेला हा फोन 150W फास्ट चार्जिंगने सुसज्ज आहे. आता कंपनी या हँडसेटचा नवा कलर पर्याय आणणार आहे. फोनचा नवीन रंग प्राइम ब्लू आहे आणि कंपनी त्याला OnePlus 10R प्राइम ब्लू एडिशन म्हणून विकणार आहे. फोनच्या या आगामी आवृत्तीची मायक्रोसाइट Amazon India वर लाईव्ह  झाली आहे. 

हे सुद्धा वाचा : मज्जाच मजा ! Vodafone Idea दर महिन्याला 2GB डेटा मोफत ऑफर करतोय, असा घ्या फायदा

Amazon India च्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये त्याची विक्री सुरू होईल असे मानले जाते. फोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्समध्ये कोणताही बदल होणार नाही.

OnePlus 10R फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

हा फोन 1080×2412 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7-इंच फुल HD+ 10-बिट AMOLED डिस्प्लेसह येतो. डिस्प्ले 120Hz च्या रीफ्रेश दर आणि 360Hz च्या टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. चांगल्या पिक्चर कॉलिटीसाठी, कंपनी या फोनमध्ये HDR10+ देखील देत आहे. तसेच, डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी या फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देखील आहे.

याशिवाय, सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये 5000mAh आणि 4500mAh बॅटरी ऑप्शन आहेत. 5000mAh बॅटरी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तर, कंपनी 4500mAh वेरिएंटमध्ये 150W चार्जिंग देत आहे.

OnePlus 10R 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज ऑप्शनमध्ये येतो. प्रोसेसर म्हणून कंपनी त्यात MediaTek Dimensity 8100 Max चिपसेट देत आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील पॅनलवर LED फ्लॅशसह तीन कॅमेरे आहेत. यामध्ये 50-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरासह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्सचा समावेश आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo