OnePlus वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी ! आता सहज घेता येईल 5G इंटरनेट स्पीडचा आनंद
OnePlus 10 Pro, 10R आणि 10T च्या वापरकर्त्यांसाठी खुशखबर
या हँडसेटमध्ये कंपनीने Jio 5G इंटरनेट सेवेसाठी अपडेट आणले आहे.
सध्या हे अपडेट फक्त काही वापरकर्त्यांसाठी आणले जात आहे.
OnePlus वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. जर तुम्ही OnePlus 10 Pro, OnePlus 10T किंवा OnePlus 10R स्मार्टफोन वापरत असाल तर तुम्हाला आता 5G इंटरनेट स्पीडची मजा मिळणार आहे. रिलायन्स Jio च्या 5G सेवेला सपोर्ट करण्यासाठी कंपनीने नवीन सॉफ्टवेअर अपडेट आणले आहे. या फोनच्या सेटिंग्जमध्ये दिलेल्या सिस्टम अपडेट ऑप्शनवर जाऊन तुम्ही हे लेटेस्ट अपडेट तपासू शकता. सध्या हे अपडेट फक्त काही वापरकर्त्यांसाठी आणले जात आहे.
हे सुद्धा वाचा : Jio चा 30 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि 25GB डेटा, जाणून घ्या Jio चा हा स्वस्त मस्त प्लॅन
नवीन सिक्युरिटी पॅच रोलआउट
नवीन अपडेटसह, कंपनी डिव्हाइसेससाठी नवीनतम सिक्योरिटी पॅच देखील आणत आहे. OnePlus कम्युनिटी फोरमवर पोस्ट केलेल्या अधिकृत चेंजलॉगनुसार, OnePlus 10T आणि OnePlus 10 Pro साठी ऑक्टोबर 2022 चा Android सिक्योरिटी पॅच आला आहे. तसेच, कंपनीने OnePlus 10R साठी सप्टेंबर 2022 चा सिक्युरिटी पॅच आणला आहे.
उत्तम नेटवर्क आणि Wi-Fi एक्सपेरियन्स
OnePlus 10 Pro साठी NE2211 11.A.18 अपडेटमध्ये, तुम्हाला लेटेस्ट Android सिक्योरोटी पॅचसह Jio ची 5G कनेक्टिव्हिटी मिळेल. तर, OnePlus 10T चे CPH2413 11.A.10 अपडेट फोन क्रॅश होण्याच्या समस्येचे निराकरण करते. यासह, नवीन अपडेटनंतर, वापरकर्त्यांना पूर्वीपेक्षा चांगले नेटवर्क आणि Wi-Fi अनुभव आणि स्क्रीन डिस्प्ले कॉलिटी पाहण्यास मिळेल.
'या' शहरांमध्ये 5G सर्व्हिस सुरु
रिलायन्स JIO ची 5G सेवा दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि वाराणसीमध्ये सुरू झाली आहे. येथे 5G इंटरनेटची टेस्टिंग घेतली जात आहे. कंपनी या वर्षाच्या अखेरीस देशातील आणखी काही शहरांमध्ये आपली 5G सेवा सुरू करेल. Jio काही वापरकर्त्यांसोबत या सेवेची टेस्टिंग करत आहे आणि म्हणूनच OnePlus 10 सिरीजच्या या डिव्हाइसेसच्या सर्व वापरकर्त्यांना अद्याप 5G स्पीड मिळणार नाही. हँडसेटवर Jio च्या 5G सेवेशी संबंधित माहितीसाठी तुम्ही My Jio ऍप तपासू शकता.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile