OnePlus 10 Pro Price Cut: त्वरा करा! लोकप्रिय 5G स्मार्टफोन 10 हजार रुपयांनी स्वस्त

Updated on 14-Jul-2023
HIGHLIGHTS

OnePlus 10 Pro गेल्या वर्षी मार्चमध्ये कंपनीचा सर्वात पावरफुल डिव्हाइस म्हणून लाँच करण्यात आला.

या स्मार्टफोनवर थेट 10 हजार रुपयांची कपात कण्यात आली आहे.

हा फोन Amazon आणि OnePlus India च्या अधिकृत वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.

आज आम्ही OnePlus प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. OnePlus 10 Pro 5G च्या दोन्ही व्हेरियंटवर परत एकदा 5000 रुपयांची सूट मिळत आहे. हा स्मार्टफोन गेल्या वर्षी मार्चमध्ये कंपनीचा सर्वात पावरफुल डिव्हाइस म्हणून लॉन्च करण्यात आला होता. त्यानंतर, नोव्हेंबर 2022 मध्ये या स्मार्टफोनचा किमतीत 5000 रुपयांची पहिली कपात झाली होती. त्याच प्रमाणे आता या स्मार्टफोनच्या किमतीत आणखी 5,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. 

हा फोन Amazon आणि OnePlus India च्या अधिकृत वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.

OnePlus 10 Pro Price Cut:

OnePlus 10 Pro स्मार्टफोन 8GB + 128GB आणि दुसरा 12GB + 256GB अशा दोन व्हेरिएंटमध्ये येतो. लाँच दरम्यान, स्मार्टफोनच्या 8GB वेरिएंटची किंमत 66,999 रुपये आणि 12GB व्हेरिएंटची किंमत 71,999 रुपये आली होती. वर सांगितल्याप्रमाणे, पहिल्या आणि दुसऱ्या कपातीनंतर फोन थेट 10 हजार रुपयांनी स्वस्त झाला आहे. येथून खरेदी करा

म्हणजेच, 8GB व्हेरिएंट 56,999 रुपयांना आणि 12GB व्हेरिएंट 61,999 रुपयांना खरेदी करता येईल. याशिवाय बँक ऑफर्सच्या मदतीने ग्राहकांना या स्मार्टफोनवर अतिरिक्त सवलत मिळेल. तर, ICICI बँक क्रेडिट कार्ड आणि OneCard क्रेडिट कार्डने व्यवहार केल्यास Amazon वर 5000 रुपयांची झटपट सूट उपलब्ध आहे. 

OnePlus 10 Pro

OnePlus 10 Pro मध्ये 6.7-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. त्याबरोबरच, यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 48MP मेन सोनी लेन्स, 50MP अल्ट्रावाइड सेन्सर आणि 8MP मॅक्रो कॅमेरा समाविष्ट आहे. याव्यतिरिक्त, फोनमध्ये 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी मिळत आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :