digit zero1 awards

OnePlus 11 लाँच करण्यापूर्वी OnePlus 10 Pro 5G च्या किमतीत घट, खरेदी करण्याची उत्तम संधी

OnePlus 11 लाँच करण्यापूर्वी OnePlus 10 Pro 5G च्या किमतीत घट, खरेदी करण्याची उत्तम संधी
HIGHLIGHTS

OnePlus 10 Pro 5G वर मोठी सूट

OnePlus 11 लाँच होण्यापूर्वी या फोनवर भारी सवलत मिळतेय.

फोन तुम्हाला तब्बल 24 हजारांच्या डिस्काउंटमध्ये मिळू शकतो.

तुम्‍ही OnePlus लव्हर असाल तर आज आजची ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. OnePlus 11 लाँच होण्यापूर्वी OnePlus 10 Pro 5G वर 24 हजारांची सूट दिली जात आहे. OnePlus 10 Pro 5G वर उपलब्ध ऑफरचे तपशील पहा… 

हे सुद्धा वाचा : Prime Video: फेब्रुवारीमध्ये मिळेल थ्रिलर-सस्पेन्सचा डबल डोस, नवीन सिरीज आणि चित्रपट होणार रिलीज

OnePlus 10 Pro 5G वरील ऑफर्स 

8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज असलेला OnePlus फ्लॅगशिप फोन 60,999 रुपयांना उपलब्ध आहे. त्याची किंमत 66,999 रुपये आहे. पण तुम्ही ते रु. 6,000 च्या फ्लॅट डिस्काउंटसह खरेदी करू शकता. कदाचित ही किंमत तुम्हाला जास्त वाटत असेल कारण प्रत्येकाचे बजेट इतके नसते. जास्त किंमत असूनही तुम्हाला ती घ्यायची असल्यास EMI योजना देखील उपलब्ध आहेत. तुम्ही दरमहा 2,914 रुपये भरून ते खरेदी करू शकता. तुम्हाला नो कॉस्ट EMI चा पर्यायही मिळेल.

अनेकदा आपल्याकडे जुना स्मार्टफोनही पडून असतो आणि आपल्याला तो बदलायचा असतो. या फोनसोबत तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला 18,050 रुपयांपर्यंतची ऑफर मिळेल. पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यूनंतर तुम्ही हा फोन 42,949 रुपयांना खरेदी करू शकाल.

एकंदरीत डिस्काउंट बघितला तर हा फोन तुम्हाला 24 हजारांच्या डिस्काउंटमध्ये मिळू शकतो. 6 हजारांची फ्लॅट सूट आणि 18,050 रुपयांची एक्सचेंज ऑफर, अशाप्रकारे ऑफर्सचा संपूर्ण लाभ घेऊन फोन खरेदी केल्यास हाफोन तुम्हाला स्वस्तात खरेदी करता येईल. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo