टेक जायंट Apple ने काल रात्री 10:30 वाजता आपला वर्षातील सर्वात मोठा ग्लोटाइम इव्हेंट आयोजित केला होता. कंपनीने या इव्हेंटदरम्यान आपली नवी iPhone 16 सिरीज लाँच केली आहे. या इव्हेंटमध्ये कंपनीने नवीनतम iPhone 16 सिरीज, Apple वॉच सिरीज 10 आणि इतर नवीन उत्पादने लाँच केली आहेत. नवीनतम घोषणांसह काही विद्यमान उत्पादने कंपनी बंद करत आहे.
होय, लेटेस्ट iPhone 16 लाँच होताच कंपनीने iPhone 15 प्रो आणि iPhone 14 प्लस सारख्या काही लोकप्रिय मॉडेल्ससह कंपनी यावर्षी 10 पर्यंत डिव्हाइस बंद करू शकते, अशी माहिती मिळाली आहे. नवीन लाँचसह, Apple केवळ जुने मॉडेल्स बंद करत नाही तर उर्वरित स्टॉक शक्य तितक्या लवकर काढून टाकण्यासाठी ते अत्यंत स्वस्त किमतीत ऑफर करते. जेणेकरून त्यानंतर सर्व ग्राहक केवळ नवीनतम मॉडेल्सवर लक्ष केंद्रित करतात.
Apple ने iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max चे उत्पादन थांबवले आहे. कंपनीने नेहमीप्रमाणे, जुनी प्रो मॉडेल्स बंद करण्याची परंपरा चालू ठेवली आहे. सवलतींबद्दल बोलायचे झाल्यास, गेल्या वर्षी लाँच केलेला iPhone 15 Pro सध्या Amazon India वेबसाइटवर 1,24,200 रुपयांमध्ये 8% च्या थेट सवलतीसह उपलब्ध आहे, जे त्याच्या मूळ किमतीवर 10,700 रुपयांची घट आहे. एवढेच नाही तर याशिवाय, तुम्हाला 1000 रुपयांची बँक सूट आणि त्यावर 38,800 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील मिळेल.
तर, दुसरीकडे प्रो मॅक्स मॉडेलचा बेस 256GB व्हेरिएंट सध्या 12% सवलतीसह 1,40,999 रुपयांमध्ये सूचीबद्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ई-कॉमर्स कंपनी निवडक बँक कार्ड्सद्वारे या फोनवर 1000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. याशिवाय, एक्सचेंज ऑफरमध्ये 54,200 रुपयांपर्यंतची मोठी बचत देखील केली जाऊ शकते.
कंपनीने iPhone 14 आणि iPhone 15 च्या किमतीत तब्बल 10 हजार रुपयांची घट केली आहे. तर, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max ची किंमत तब्बल 15 हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे. लक्षात घ्या की, हे दोन्ही फोन अधिकृत वेबसाइटवरून काढून टाकण्यात आले आहेत. सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.