Samsung Galaxy M14 Offer: जबरदस्त 5G स्मार्टफोनवर मिळतोय बंपर डिस्काउंट, कुठे? ते बघा

Updated on 16-Jun-2023
HIGHLIGHTS

Samsung Galaxy M14 5G स्मार्टफोनवर मोठी सवलत

HDFC बँक क्रेडिट कार्ड EMI व्यवहारावर 1,250 रुपयांची सूट

फोनच्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटवर मिळतेय सवलत

Samsung Galaxy M14 5G: साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माती कंपनी Samsung चे प्रोडक्ट्स भारतीय ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत, हे आपल्याला माहितीच आहे. हातात Samsung स्मार्टफोन असण्याची मज्जा तर काही औरंच आहे. या लेखात आम्ही तुम्हाला Samsung Galaxy M14 5G स्मार्टफोनबद्दल माहिती देणार आहोत. बघुयात किंमत, ऑफर्स, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स- 

Samsung Galaxy M14 5G ची किंमत

Samsung Galaxy M14 5G स्मार्टफोन Flipkart वर सवलतीत मिळत आहे. फ्लिपकार्टवर या फोनची MRP 17,990 रुपये आहे. मात्र, यावर तुम्हाला एकूण 13% डिस्काउंट देखील मिळत आहे. या सवलतीनंतर फोन 15,595 रुपयांना सूचीबद्ध करण्यात आला आहे. 

Samsung Galaxy M14 5G वरील ऑफर्स

Samsung Galaxy M14 5G वर अनेक बँक ऑफर्स उपलब्ध आहेत. HDFC बँक क्रेडिट कार्ड EMI व्यवहारावर 1,250 रुपयांची वेगळी सूटही मिळणार आहे. या फोनवर 1 वर्षाची वॉरंटी आहे. ऍक्सेसरीजची 6 महिन्यांची वॉरंटी दिली जात आहे. या फोनसह वन डे डिलिव्हरीचे ऑप्शन देखील आहे. येथून खरेदी करा

Samsung Galaxy M14 5G चे मुख्य तपशील

वरील कथित किंमत फोनच्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची आहे. हा फोन त्याच्या डिझाईनमुळे खूप चर्चेत असतो. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 6.6 इंच लांबीचा डिस्प्ले मिळत आहे. फोनमध्ये तुम्हाला फोटोग्राफीसाठी 50MP चा रियर कॅमेरा देखील देण्यात आला आहे. त्याबरोबरच, यात 6000mAh ची बॅटरी मिळत आहे. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :