चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी ZTE ने आपल्या या स्मार्टफोन Nubia V18 च्या लॉन्च साठी मीडियाला निमंत्रण देने सुरू केले आहे.
चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी ZTE ने आपल्या या स्मार्टफोन Nubia V18 च्या लॉन्च साठी मीडियाला निमंत्रण देने सुरू केले आहे. गिज्मोचाइना च्या एका रिपोर्ट नुसार, Nubia V18 स्मार्टफोन मध्ये एक लॉन्ग बॅटरी असणार आहे, जसे की आपण Nubia N3 स्मार्टफोन मध्ये पहिले होते तसाच हा स्मार्टफोन पण 5,000mAh क्षमतेच्या बॅटरी सह येऊ शकतो.
याव्यतिरिक्त या स्मार्टफोन ची किंमत या रिपोर्ट नुसार CNY 1,000 म्हणजे जवळपास Rs. 10,000 एवढी भारतात याची किंमत असू शकते.
या रिपोर्ट मध्ये हे पण समोर येत आहे आणि इनवाईट मध्ये पण असाच काही लिहिले आहे की या स्मार्टफोन मध्ये एक फुल-स्क्रीन डिस्प्ले असू शकतो जी 6-इंचाची एक एज-तू-एज स्क्रीन असेल.
याव्यतिरिक्त तुम्हाला सांगू इच्छितो की इतर काही कंपन्या जसे Xiaomi, Huawei, Lenovo, आणि Meizu पण आपले स्मार्टफोंस या तारखेच्या आसपास लॉन्च करू शकतात. काही दिवसांपूर्वी Nubia ने आपल्या Nubia N3 स्मार्टफोन ला लॉन्च केले होते. या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला एक 5.99-इंचाचा डिस्प्ले क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट आणि 5,000mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे. तसेच यात कोणतेही होम बटन नाही आहे.
सोबत Nubia N3 स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 4GB की रॅम आणि 64GB ची इंटरनल स्टोरेज पण देण्यात आली आहे. नोट: फीचर्ड इमेज Nubia N3 स्मार्टफोन ची आहे.