Nubia स्मार्टफोन कंपनी बाजारातील एक अशी कंपनी आहे, जी वेळोवेळो स्मार्टफोन गेमर्सना आकर्षित करण्यासाठी स्मार्टफोन्स अनंत असते. आणि असेच यावेळी पण झाले आहे. Nubia ने नुकताच भारतात आपला एक गेमिंग स्मार्टफोन म्हणजे Nubia Red Magic लॉन्च केला होता. आणि आता कंपनी ने याच स्मार्टफोनचा नवीन वेरिएंट चीन मधील बाजारात लॉन्च केला आहे. या नवीन वर्जनला Nubia Red Magic Mars RNG Edition असे नाव देण्यात आले आहे. या स्मार्टफोनची सर्वात खास बाब याचे नाव आहे असे आपण म्हणू शकतो. RNG हे जे नाव देण्यात आले आहे ते चीनी ई-स्पोर्ट टीम रॉयल नेवर गिव-अप मधून घेण्यात आले आहे. हा नवीन वेरिएंट रेड कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे, आणि या मोबाईल फोन वर RNG च्या प्लेयर्सच्या सह्या आहेत. तसेच हा तुम्हाला 8GB रॅम आणि 10GB रॅम ऑप्शन्स मध्ये मिळणार आहे.
अगर हम Nubia Red Magic Mars RNG Edition चे स्पेसिफिकेशन पाहता या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक 6-इंचाची FHD+ स्क्रीन 18:9 आस्पेक्ट रेश्यो सह मिळत आहे. तसेच हा रेड मॅजिक OS 1.6 वर चालतो, जो एंड्राइड 9.0 वर आधारित आहे. त्याचबरोबर फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 प्रोसेसर पण देण्यात आला आहे. फोन 8GB रॅम व 10GB रॅम आणि 128GB स्टोरेज तसेच 256GB स्टोरेज सोबत पण लॉन्च केला गेला आहे. या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला फास्ट चार्जिंग सह 3,800mAh क्षमता असलेली एक बॅटरी पण मिळत आहे.
कॅमेरा बद्दल बोलायचे झाले तर या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक 16MP चा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, तसेच यात एक 8MP चा फ्रंट कॅमेरा पण मिळत आहे. तुम्हाला तर माहितीच आहे कि हा मोबाईल फोन एका नार्मल फोन प्रमाणे लॉन्च केला गेलेला नाही. हा मोबाईल फोन एक गेमिंग स्मार्टफोन म्हणून लॉन्च झाला आहे. त्यामुळे यात तुम्हाला जास्त चांगला कॅमेरा मिळत नाही, सोबत यात ड्यूल कॅमेरा पण मिळत नाही. तसेच गेमिंग फोन असल्यामुळे यात तुम्हाला एयर आणि लिक्विड कुलिंग टेक्नॉलॉजी पण मिळत आहे. जी फोनचे तापमान गेमिंग मध्ये नियंत्रित करते.
हा मोबाईल फोन वर सांगतिल्याप्रमाणे दोन वेगवेगळ्या रॅम आणि स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे, या मोबाईल फोनचा 8GB रॅम वेरिएंट तुम्ही CNY 3,299 म्हणजे जवळपास Rs 33,478 मध्ये घेऊ शकता, तसेच तुम्ही याचा 10GB रॅम वेरिएंट घेऊ इच्छित असाल तर तुम्ही हा CNY 3,888 म्हणजे जवळपास Rs 39,486 मध्ये घेऊ शकता.