आता स्नॅपडीलवरही उपलब्ध होणार ऑनर स्मार्टफोन्स

Updated on 04-Nov-2015
HIGHLIGHTS

हुआवे स्नॅपडीलवर ऑनर स्मार्टफोनला डिस्काउंटसह उपलब्ध करणार आहे. ज्यात ऑनर 4X 8,999 रुपये, ऑनर 4X (gold) 9,499, ऑनर 4C ७,९९९ रुपये आणि ऑनर B ३,९९९ रुपयात उपलब्ध होतील, त्याचबरोबर HDFC डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड खरेदीवर १० टक्क्यांची सूटही मिळणार आहे.

मोबाईल निर्माता कंपनी हुआवेचे ऑनर सीरिजचे स्मार्टफोन्स आता ऑनलाईन शॉपिंग साइट स्नॅपडीलवरसुद्धा उपलब्ध होतील. जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी कंपनी स्नॅपडीलशी भागीदारी करत आहे.

 

हुआवेचे ऑनर सीरिजचे स्मार्टफोन आता स्नॅपडीलवर डिस्काउंटसह उपलब्ध होतील. ज्यात ऑनर 4X 8,999 रुपये, ऑनर 4X (gold) 9,499, ऑनर 4C ७,९९९ रुपये आणि ऑनर B ३,९९९ रुपयात उपलब्ध होतील, त्याचबरोबर HDFC डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड खरेदीवर १० टक्क्यांची सूटही मिळणार आहे.

आतापर्यंत ऑनर स्मार्टफोन्स फक्त ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवरुनच खरेदी करु शकत होतो. मात्र ऑनर ब्रँडचे ऑनर७ आणि ऑनर ७ प्लस अजूनही फक्त फ्लिपकार्टवरच विक्रीसाठी उपलब्ध होतील.

ह्याबाबत अधिक माहिती देताना हुआवे इंडियाचे कंझ्यूमर बिजनेस ग्रुप पी संजीव यांनी सांगितले की, ‘आम्हाला पुर्ण विश्वास आहे की, ह्या भागीदारीनंतर मोठ्या स्तरावर ऑनर स्मार्टफोन प्रेमींपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.’

हुआवेने भारतात ऑनर स्मार्टफोनची विक्री काही काळ आधी पहिली फ्लिपकार्टच्या माध्यमातून सुरु केली होती. आता कंपनीचे लक्ष्य ह्यावर्षाच्या शेवटपर्यंत कमीत कमी १५ ते २० लाख ऑनर स्मार्टफोन सेल करणे हे आहे.

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech.

Connect On :