Nothing Phone (3) जागतिक बाजारात होणार दाखल! CEO कार्ल पेई यांनी दिले संकेत, वाचा सविस्तर 

Nothing Phone (3) जागतिक बाजारात होणार दाखल! CEO कार्ल पेई यांनी दिले संकेत, वाचा सविस्तर 
HIGHLIGHTS

Nothing आपला आगामी स्मार्टफोन Nothing Phone (3) लाँच करण्याचा विचार करत आहे.

आगामी Nothing Phone (3) स्मार्टफोन AI फीचर्सना समर्थन देईल.

Nothing चे CEO कार्ल पेई यांनी Nothing Phone (3) बद्दल माहिती दिली.

Nothing ने गेल्या वर्षी जुलैमध्ये Nothing Phone (2) जागतिक बाजारात लाँच केला होता. लाँच होताच या स्मार्टफोनला ग्राहकांनी चांगली पसंती दर्शवली. आता स्मार्टफोन ब्रँड या उपकरणाची अपग्रेड केलेली आवृत्ती म्हणजेच Nothing Phone (3) लाँच करण्याचा विचार करत आहे. दरम्यान, कंपनीचे CEO कार्ल पेई यांनी आगामी स्मार्टफोनच्या लाँच संबंधित महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. वाचा सविस्तर-

Also Read: OPPO F27 Pro+ 5G फोनची भारतातील लाँच डेट जाहीर, पाण्यातही खराब होणार नाही, बघा टीजर Video

काय म्हणाले Nothing चे CEO?

Nothing चे CEO कार्ल पेई यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान आणि त्याचा वापर यावर आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, “AI हार्ड हे फारसे प्रभावी नाही. कंपनी स्मार्टफोनवर भर देणार आहे. पुढे ते म्हणाले की, Nothing Phone (3) हा ट्रेंड सुरु ठेवेल. पूर्णपणे नवीन AI-आधारित उपकरण सादर करण्याऐवजी परिचित स्मार्टफोन डिझाइनमध्ये AI फीचर्सना समर्थन देईल.”

सीईओ कार्ल पेई पुढे म्हणाले की, “पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये नथिंग फोन 3 पासून AI मध्ये सुधारणा केली जाईल आणि हळूहळू सादर केली जाईल, अशी आम्हाला अशा आहे. मात्र, अद्याप त्यांनी फोनच्या लॉन्चिंग किंवा लाँच तारखेबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.”

Nothing Phone (3) चे अपेक्षित तपशील

अलीकडेच आलेल्या ताज्या अहवालांवर विश्वास ठेवला तर, Nothing Phone 3 मध्ये विद्यमान फोन्सप्रमाणे पारदर्शक आणि अनोखे डिझाइन असेल. यात एलईडी लाइटसह OLED डिस्प्ले असेल, ज्याचा रीफ्रेश दर 120Hz असू शकतो. आगामी फोनमध्ये सुरळीत कामकाजासाठीस्नॅपड्रॅगन 8 Gen 3 सोबत 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज मिळू शकते. त्याच वेळी, हा फोन नवीनतम Android 15 ऑपरेटिंग सिस्टमवर देखील कार्य करेल. या फोनची किंमत देखील प्रीमियम श्रेणीत ठेवली जाऊ शकते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo