ट्रान्सपरंट डिझाईनसाठी प्रसिद्ध Nothing चे दोन स्मार्टफोन लवकरच होणार लाँच, नवे Earbuds देखील होणार रिलीज 

ट्रान्सपरंट डिझाईनसाठी प्रसिद्ध Nothing चे दोन स्मार्टफोन लवकरच होणार लाँच, नवे Earbuds देखील होणार रिलीज 
HIGHLIGHTS

Nothing नवीन स्मार्टफोन्स Nothing Phone 2a आणि Nothing Phone 3 वर काम करत आहे.

या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत Nothing Phone 2a लाँच केला जाईल.

कंपनी वायरलेस इयरबड्स CMF Nothing Buds 2 Pro वर काम करत आहे.

गेल्या काही काळापासून प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Nothing नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे. नवीन स्मार्टफोन Nothing Phone 2a मॉडेल असेल असे अलीकडील अहवालात सुचवण्यात आले होते. पण आता एका नवीन रिपोर्टमध्ये या फोनसोबतच नेक्स्ट जनरेशन फ्लॅगशिप Nothing Phone 3 ची लाँच डेट देखील समोर आली आहे. चला तर मग जाणून घेऊयात आगामी Nothing स्मार्टफोन्सबद्दल सर्व तपशील.

हे सुद्धा वाचा: Realme 12 Pro Max 5G ची ‘या’ दिवशी भारतात होणार दाखल, किंमत लाँचपूर्वीच लीक। Tech News

Nothing working on new Nothing Phone 2a smartphone
Nothing working on new Nothing Phone 2a smartphone

आगामी Nothing Phone कधी होणार लाँच?

प्रसिद्ध टिपस्टरने X वर माहिती शेअर केली होती. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत Nothing Phone 2a लाँच केला जाईल, असे या ट्विटमधून समोर आले आहे. आपण नवीन फोन जानेवारी ते मार्च 2024 दरम्यान लाँच होण्याची अपेक्षा करू शकतो. टिपस्टरने असेही सांगितले की, प्रीमियम Nothing Phone 3 स्मार्टफोन जुलै 2024 मध्ये सादर केला जाईल, अशी शक्यता आहे.

एवढेच नाही तर, कंपनी एका वेअरेबल डिवाइसवरही काम करत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, ब्रँड वायरलेस इयरबड्स CMF Nothing Buds 2 Pro वर काम करत आहे. नवीन इयरबड्स CMF Buds Pro ची अपग्रेड केलेली आवृत्ती असू शकते. या इअरबड्सचे अधिकृत नाव काय असेल याबाबत काही माहिती देण्यात आलेली नाही.

Nothing Phone 2 price cut during Flipkart Sale

Nothing Phone 2a चे संभावित तपशील

आगामी स्मार्टफोनच्या संभावित स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, Nothing Phone 2a मध्ये 6.7 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले असू शकतो, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि FHD+ रिझोल्यूशन असेल. फोन 2a च्या मागील बाजूस 1/1.5 इंच सेन्सर आकार आणि 1.0 मायक्रॉन पिक्सेल आकारासह 50MP Samsung S5KGN9 कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटमध्ये 32MP चा Sony IMX615 कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या की, वरील सर्व माहिती लीक झालेल्या अहवालांनुसार देण्यात आलेली आहे. मात्र, फोनबद्दल योग्य माहिती हे स्मार्टफोन्स लाँच झाल्यावरच पुढे येईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo