Nothing Phone (2a) स्पेशल एडिशन स्मार्टफोन लाँच, काय मिळेल विशेष? जाणून घ्या किंमत

Updated on 30-May-2024
HIGHLIGHTS

कंपनीने आता Nothing Phone (2a) नवीन अवतारात लाँच केला आहे.

Nothing Phone (2a) स्पेशल एडिशन या नावाने हा मोबाईल भारतासह जागतिक बाजारपेठेत दाखल

Nothing Phone (2a) स्मार्टफोन 5 जूनपासून केवळ Flipkart द्वारे उपलब्ध होईल.

अनोख्या पारदर्शक डिझाईनसाठी प्रसिद्ध असलेल्या Nothing फोनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अद्वितीय स्मार्टफोन बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या कंपनीने अलीकडेच Nothing Phone (2a) लाँच केला होता. त्यानंतर, कंपनीने आता Nothing Phone (2a) नवीन अवतारात लाँच केला आहे. Nothing Phone (2a) स्पेशल एडिशन या नावाने हा मोबाईल भारतासह जागतिक बाजारपेठेत दाखल झाला आहे. चला तर मग बघुयात Nothing Phone (2a) स्पेशल एडिशनमध्ये काय मिळेल विशेष?

Also Read: WhatsApp Update: आता फोटो एडिट करून अधिक आकर्षक बनवा, App वर येणार नवे कलर टूल

Nothing Phone (2a) स्पेशल एडिशन

Nothing ने मिश्र रंगांचा वापर करून ते अधिक वेगळे आणि विशेष करण्याचा प्रयत्न केला आहे. नवीन Nothing Phone (2a) स्पेशल एडिशन रेड, येलो आणि ब्लु यासारख्या प्रायमरी कलरसह येतो. नवीन स्मार्टफोनमध्ये प्रथमच हे तिन्ही रंग वापरले गेले आहेत.

वर दिलेल्या पोस्टमध्ये बघू शकता की, पिल शेप्ड कॅमेरा मॉड्यूलभोवती ब्लु अक्सेंट दिसत आहे. यासह, मागील पॅनेलवर रेड आणि येलो कलर दिसत आहेत. हे कलर शेड सोडले की, फोनचे डिझाइन आणि इतर फीचर्स पूर्वीप्रमाणेच आहेत.

Nothing Phone (2a) स्पेशल एडिशनची किंमत

Nothing Phone (2a) स्पेशल एडिशन 12GB+256GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. या स्मार्टफोनची किंमत 27,999 रुपये ठेवण्यात आली आहे. फोनवरील उपलब्ध ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ब्रँड निवडक कार्ड व्यवहारांवर 1,000 रुपयांची सूट देखील देईल. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्टफोन 5 जूनपासून केवळ Flipkart द्वारे उपलब्ध होईल.

Nothing Phone 2a Special Edition Launched

Nothing Phone (2a) स्पेशल एडिशनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Nothing Phone (2a) स्पेशल एडिशनमध्ये मागील मॉडेल्सप्रमाणे 6.7-इंच लांबीचा FHD+ AMOLED डिस्प्ले देखील आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी यात गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन देखील असेल. उत्तम परफॉर्मन्ससाठी, यात MediaTek Dimensity 7200 Pro चिपसेट उपस्थित आहे. Mediatek Dimensity 7200 चिपसेट मध्य-श्रेणी विभागातील गेमरसाठी एक उत्कृष्ट पर्याय म्हणून उदयास आला आहे. जो गेमिंग लव्हर्सना भारी फीचर्स प्रदान करतो.

फोटोग्राफीसाठी, Nothing Phone (2a) प्रमाणे OIS + EIS सह 50MP प्रायमरी कॅमेरा मिळतो. त्याबरोबरच, 50MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा मिळेल. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP फ्रंट कॅमेरा दिला जात आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :