Nothing Phone (2a) Plus स्मार्टफोन अखेर भारतात लाँच
Nothing Phone (2a) plus भारतात दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे.
Nothing Phone (2a) plus फोनवर 2000 रुपयांची सूट देखील दिली जाणार आहे.
बहुप्रतीक्षित Nothing Phone (2a) Plus स्मार्टफोन अखेर भारतात लाँच करण्यात आला आहे. हे कंपनीचे नवे मिड रेंज डिवाइस आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, इतर नथिंग स्मार्टफोन्सप्रमाणे या मॉडेलमध्ये ग्लिफ लाइटिंग सिस्टम देखील आहे. या फोनमध्ये अनेक पॉवरफुल फीचर्स देण्यात आले आहेत. ज्यामध्ये एकूण 20GB रॅम आणि 50MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. चला तर मग जाणून घेऊयात या फोनची किंमत, उपलब्धता आणि स्पेसिफिकेशनशी संबंधित सर्व तपशील-
Nothing Phone (2a) plus भारतात दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनचा 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट 29,999 रुपयांना सादर करण्यात आला आहे. तर, 12GB आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 31,999 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 2000 रुपयांची सूट देखील दिली जाणार आहे. या फोनमध्ये ब्लॅक आणि ग्रे कलरचे पर्याय सादर करण्यात आले आहेत. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 7 ऑगस्टपासून Flipkart वर दुपारी 12 वाजता सुरू होईल.
Nothing Phone (2a) plus चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Nothing Phone 2(a) plus फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन MediaTek डायमेन्सिटी 7350 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. या प्रोसेसरसह पॉवरफुल पीक परफॉर्मन्स, अखंड मल्टीटास्किंग, अविश्वसनीय गेमिंग परफॉर्मन्स इ. सर्व काही मिळेल. यासह 12GB रॅम आणि 8GB रॅम बूस्टर सुविधा उपलब्ध असेल. अशा प्रकारे फोनमध्ये तुम्हाला एकूण 20GB रॅम सपोर्ट मिळणार आहे.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर, दुसरा कॅमेरा 50MP चा आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 50MP फ्रंट कॅमेरा असेल. पॉवरसाठी, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी उपलब्ध आहे, ज्यामध्ये 50W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.