बहुप्रतीक्षित Nothing Phone (2a) Plus ची भारतीय लाँच डेट कन्फर्म! नव्या फोनचे टीजर जाहीर

Updated on 19-Jul-2024
HIGHLIGHTS

Nothing चा नवीन स्मार्टफोन Nothing Phone (2a) Plus लवकरच भारतात होणार लाँच

Nothing India ने आपल्या अधिकृत X (ट्विटर) हँडलद्वारे नवीन स्मार्टफोन लाँच टीज केले.

Nothing Phone (2a) Plus या महिन्याच्या शेवटी लाँच होणार

Nothing Phone (2a) नंतर आता कंपनी Nothing Phone (2a) Plus फोन सादर करणार आहे. आतापर्यंत Nothing च्या आगामी फोनबद्दल सर्वत्र चर्चा सुरु होती. पण, आता कंपनीने हे आगामी स्मार्टफोनबद्दल अधिकृतपणे माहिती शेअर केली आहे. कंपनीने नुकतेच या स्मार्टफोनच्या भारतीय लाँच डेटची पुष्टी केली आहे. अलीकडेच, कंपनीने नथिंगच्या सब-ब्रँड CMF चा पहिला स्मार्टफोन CMF Phone 1 भारतात लाँच केला आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Nothing Phone (2a) Plus चे सर्व तपशील-

Also Read: अनेक अप्रतिम फीचर्ससह Honor 200 Series भारतीय बाजारात लाँच! पहा किंमत आणि टॉप 5 फीचर्स

Nothing Phone (2a) Plus ची भारतीय लाँच डेट

नुकतेच Nothing India ने आपल्या अधिकृत X (ट्विटर) हँडलद्वारे नवीन स्मार्टफोन लाँच टीज केले आहे. हा फोन Nothing Phone (2a) Plus असणार आहे. यासोबतच, कंपनीने या फोनच्या लाँच डेटची देखील पुष्टी केली आहे. हा फोन भारतात 31 जुलै रोजी लाँच करण्यात येईल. तुम्ही पोस्टमध्ये बघू शकता की, या पोस्टमध्ये कंपनीने फोनचे टीझर पोस्टर देखील उघड केले आहे.

Nothing Phone (2a)

वर सांगितल्याप्रमाणे, Nothing ने याआधी Nothing Phone (2a) भारतात लाँच केला होता. नथिंग फोन (2a) ची किंमत 23,999 रुपयांपासून सुरू होते, जी 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत आहे. या फोनच्या स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 6.7 इंच लांबीच्या AMOLED डिस्प्ले सह येतो, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन MediaTek Dimensity 7300 Pro प्रोसेसरने सुसज्ज आहे.

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये OIS सपोर्टसह 50MP प्रायमरी कॅमेरा आहे. यासोबतच, फोनमध्ये 50MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा देखील आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :