लेटेस्ट Nothing Phone (2a) Plus ची पहिली Sale आज भारतात होणार सुरु, प्रचंड Discount सह खरेदी करण्याची संधी

लेटेस्ट Nothing Phone (2a) Plus ची पहिली Sale आज भारतात होणार सुरु, प्रचंड Discount सह खरेदी करण्याची संधी
HIGHLIGHTS

नवीनतम Nothing Phone (2a) Plus ची पहिली विक्री आजपासून भारतात सुरु होणार

Nothing Phone (2a) Plus फोन कंपनीने मिड बजेट रेंजमध्ये सादर केला आहे.

Nothing Phone (2a) Plus मध्ये तब्बल 50MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Nothing ने आपला नवा स्मार्टफोन Nothing Phone (2a) Plus जुलै महिन्याच्या अखेरीस भारतीय बाजारात लाँच केला. त्यानंतर, या स्मार्टफोनची विक्री आजपासून म्हणजेच 7 ऑगस्ट 2024 पासून सुरू होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, पहिल्या सेलदरम्यान हा स्मार्टफोन बंपर डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी आहे. कंपनीच्या इतर स्मार्टफोन्सप्रमाणे यामध्येही तुम्हाला आकर्षक, युनिक ट्रान्सपरंट डिझाईन पाहायला मिळेल. जाणून घेऊयात Nothing Phone (2a) Plus स्मार्टफोनची किंमत, ऑफर्स आणि सर्व तपशील-

Also Read: Latest Smartphones under 30k: मिड रेंजमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा आहे? बघा Best ऑप्शन्स 

Nothing Phone (2a) Plus वरील पहिल्या सेलमधील ऑफर्स

पहिल्या सेलदरम्यान Nothing Phone (2a) Plus वर अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत. या फोनची विक्री आज दुपारी 12 वाजता प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर सुरू होईल. फ्लिपकार्ट सेलमध्ये, ICICI बँक कार्ड्सवर 1500 रुपयांपर्यंत अतिरिक्त सवलत मिळेल. हा फोन ग्रे आणि ब्लॅक कलर ऑप्शन्ससह सादर करण्यात आला आहे.

Nothing Phone (2a) Plus फोन कंपनीने मिड बजेट रेंजमध्ये सादर केला आहे. या फोनचा बेस व्हेरिएंट 27,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 8GB रॅमसह 256GB अंतर्गत स्टोरेज आहे. तर, फोनचा टॉप व्हेरिएंट 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो, ज्याची किंमत 29,999 रुपये आहे.

Nothing Phone (2a) Plus चे फीचर्स आणि स्पेक्स

Nothing च्या या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये MediaTek Dimensity 7350 प्रोसेसर देण्यात आला आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेजसह येतो. त्याबरोबरच, या फोनमध्ये 8GB व्हर्चुअल रॅमचा पर्यायदेखील उपलब्ध आहे. या फोनला पाणी आणि धुळापासून संरक्षणासाठी IP54 रेटिंग देण्यात आली आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील उपलब्ध आहे.

nothing phone (2a) plus features and specs

फोटोग्राफीसाठी, फोटोग्राफीसाठी Nothing Phone (2a) Plus च्या मागील बाजूस ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP मुख्य कॅमेरा आणि 50MP दुसरा कॅमेरा समाविष्ट आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस तब्बल 50MP कॅमेरा मिळेल. पॉवरसाठी, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 50W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo