ब्रँडने शेअर केला Nothing Phone (2a) Plus चे आकर्षक डिझाईन, मिळेल 50MP सेल्फी कॅमेरा 

ब्रँडने शेअर केला Nothing Phone (2a) Plus चे आकर्षक डिझाईन, मिळेल 50MP सेल्फी कॅमेरा 
HIGHLIGHTS

Nothing चा आगामी स्मार्टफोन Nothing Phone (2a) Plus उद्या म्हणजेच 31 जुलै रोजी भारतात लाँच होणार

Nothing Phone (2a) Plus लाँचपूर्वी फोनची डिझाईन उघड

जाणून घ्या Nothing Phone (2a) Plus चे कन्फर्म तपशील

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Nothing चा आगामी स्मार्टफोन Nothing Phone (2a) Plus उद्या म्हणजेच 31 जुलै रोजी भारतात लाँच होणार आहे. लाँचपूर्वी, ब्रँडने त्याच्या डिझाइनचे अनावरण केले आहे. नवीन डिव्हाइस मागील मॉडेल 2A सारखे दिसत असले तरी यात काही बदल देखील आहेत. पाहुयात आगामी Nothing Phone (2a) Plus चे लूक आणि सर्व फीचर्स-

Also Read: बहुप्रतीक्षित Realme 13 Pro Series 5G अखेर भारतीय बाजारात लाँच, जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि ऑफर्स

Nothing Phone (2a) Plus चे डिझाईन

Nothing ब्रँडने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर उद्या लाँच होणाऱ्या Nothing Phone (2a) Plus संदर्भात एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये फोनचे डिझाईन समोर आले आहे. तुम्ही खालील पोस्टमध्ये Nothing Phone 2a Plus चे लुक पाहू शकता. ज्यामध्ये बॅक पॅनलचे डिझाईन पाहिले जाऊ शकते.

पोस्टमधील फोटोमधून समजते की, नवीन फोनचा मागील मॉडेल Nothing Phone (2a) सारखाच ग्लिफ इंटरफेस लुक आहे. तो कॅमेराभोवती ठेवला आहे. त्याबरोबरच, डिव्हाइस सिल्व्हर कलर ऑप्शनमध्ये दर्शविले आहे. तर, उद्या Nothing Phone (2a) Plus आणखी भारी कलर ऑप्शन्ससह लाँच केला जाऊ शकतो.

Nothing Phone (2a) Plus चे कन्फर्म तपशील

Nothing Phone (2a) Plus मध्ये 12GB रॅम असल्याची पुष्टी देखील झाली आहे. यात 8GB रॅम बूस्टर तंत्रज्ञान देखील असेल. ज्याच्या मदतीने 20GB पर्यंत पॉवर मिळेल. Nothing Phone (2a) Plus मध्ये MediaTek Dimensity 7350 Pro SoC असल्याची पुष्टी झाली आहे. या चिपसेटसह लाँच होणारा हा पहिला फोन असेल. ब्रँडनुसार, नवीन फोन मागील फोन (2a) पेक्षा 10% चांगली कामगिरी देईल, असे सांगितले जात आहे.

nothing phone 2a plus

फोटोग्राफीसाठी, Nothing Phone (2A) Plus च्या मागील पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल. ज्यामध्ये 50MP प्राइमरी कॅमेरा लेन्स आणि दुसरी 50MP लेन्स दिली जाईल. म्हणजेच फोटोग्राफी प्रेमींसाठी हा फोन उत्तम ठरणार आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी मोबाइलमध्ये एक विशेष 50MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध असेल. जे मागील मॉडेल 2A मध्ये आढळलेल्या 32MP पेक्षा मोठे अपग्रेड आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo