Attractive ट्रान्सपरंट डिझाईनसह बहुप्रतीक्षित Nothing Phone 2a अखेर भारतात लाँच, किंमत बजेटमध्ये आहे का? Tech News 

Attractive ट्रान्सपरंट डिझाईनसह बहुप्रतीक्षित Nothing Phone 2a अखेर भारतात लाँच, किंमत बजेटमध्ये आहे का? Tech News 
HIGHLIGHTS

Nothing Phone 2a भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आला आहे.

Nothing Phone 2a कंपनीने भारतीय बाजारात लाँच केला आहे.

या फोनचे डिझाईन ब्रँडच्या इतर मॉडेल्सपेक्षा खूपच वेगळे आणि आकर्षक आहे.

मागील बऱ्याच काळापासून Nothing च्या लेटेस्ट स्मार्टफोन लाँचची चर्चा टेक विश्वात सुरु होती. आता अखेर Nothing Phone 2a भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन 25000 रुपयांपेक्षा कमी किमतीत सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे नव्या फोनच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनचे डिझाईन ब्रँडच्या इतर मॉडेल्सपेक्षा खूपच वेगळे आणि आकर्षक आहे.

हे सुद्धा वाचा: Samsung Galaxy F15 5G Price: 12GB रॅम आणि 6000mAh बॅटरीसह Affordable 5G फोन भारतात लाँच, बघा किंमत। Tech News

होय, या फोनमध्ये Nothing च्या स्वाक्षरीचे ट्रान्सपरंट डिझाइन देखील दिले गेले आहे. त्याबरोबरच, या फोनमध्ये ग्लिफ इंटरफेसही देण्यात आला आहे. फोनच्या मागील बाजूस ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Nothing Phone 2a ची किंमत, उपलब्धता आणि स्पेसिफिकेशनशी संबंधित सर्व तपशील.

Nothing Phone 2a camera

Nothing Phone 2a ची भारतीय किंमत

Nothing Phone 2a कंपनीने भारतीय बाजारात लाँच केला आहे. या फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 23,999 रुपये आहे. 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 25,999 रुपये आहे. 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजची किंमत 27,999 रुपये आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 12 मार्च रोजी दुपारी 12 वाजता Flipkart द्वारे सुरू होईल. त्या दिवशी तुम्ही हा फोन 19,999 रुपयांना खरेदी करू शकता. या फोनमध्ये व्हाइट, मिल्क आणि ब्लॅक कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत.

Nothing Phone 2a चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Nothing Phone 2a स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा FHD+ OLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी हा फोन MediaTek Dimensity 7200 Pro प्रोसेसरने सुसज्ज आहे. स्टोरेज सेक्शनमध्ये फोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे. यासोबतच, 8GB व्हर्चुअल रॅमचा सपोर्ट देखील मिळणार आहे. विशेष म्हणजे यात ऍडव्हान्स लिक्विड कूलिंग सिस्टम आहे, जी दीर्घ गेमिंग सत्रांदरम्यान फोनला गरम होण्यापासून प्रतिबंधित करते.

Nothing Phone 2a features
Nothing Phone 2a features

त्याबरोबरच, फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात GN9 OIS सह 50MP प्रायमरी कॅमेरा आहे. 50MP अल्ट्रा-वाइड सेन्सरचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा आहे. याव्यतिरिक्त, फोनमध्ये बॅटरी 5000mAh आहे, जी 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

फोनमध्ये उपलब्ध इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन Android 14 आधारित NothingOS 2.5 वर काम करतो. या फोनला 3 अँड्रॉइड अपडेट्स मिळतील. यासह, सुरक्षा पॅच अपडेट्स 4 वर्षांपर्यंत उपलब्ध असतील. सुरक्षिततेसाठी यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo