digit zero1 awards

MWC 2024 मध्ये लाँच होणार जबरदस्त Nothing Phone 2a, किंमत आणि स्पेसिफिकेशन्स ऑनलाईन लीक। Tech News 

MWC 2024 मध्ये लाँच होणार जबरदस्त Nothing Phone 2a, किंमत आणि स्पेसिफिकेशन्स ऑनलाईन लीक। Tech News 
HIGHLIGHTS

आगामी स्मार्टफोन Nothing Phone 2a लवकरच लाँच केला जाईल.

हा स्मार्टफोन 2024 मध्ये भारतासह अनेक बाजारपेठांमध्ये लाँच केला जाईल.

नथिंगच्या या फोनच्या मागील बाजूस नवीन डिझाइन मिळण्याची अपेक्षा

टेक विश्वात आता Nothing च्या आगामी स्मार्टफोनची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. Nothing Phone 2a लवकरच लाँच केला जाईल. नथिंग ब्रँडचा हा तिसरा स्मार्टफोन असेल, जो लवकरच बाजारात येऊ शकतो. यूके बेस्ड ब्रँडच्या या स्मार्टफोनचे फीचर्स अलीकडेच लीक झाले आहेत. एवढेच नाही तर, आता त्याची किंमतही समोर आली आहे. मात्र, या स्मार्टफोनबाबत ब्रँडकडून कोणतीही अधिकृत माहिती शेअर करण्यात आलेली नाही.

हे सुद्धा वाचा: WhatsApp Update: वेब युजर्ससाठी आले अतिशय Important फिचर, ऐकून तुम्हीही व्हाल खुश! Tech News

दरम्यान, या ब्रँडने Nothing Phone आणि Nothing Phone 2 सादर केले. हे दोन्ही स्मार्टफोन प्रीमियम मिड बजेट रेंजमध्ये सादर करण्यात आले आहेत. त्यानुसार आगामी फोन मिड बजेटमध्ये सादर केला जाऊ शकतो.

Nothing Phone 2a

Nothing Phone 2a ची लीक किंमत आणि लॉन्चिंग डिटेल्स

नुकतेच पुढे आलेल्या ऑनलाईन लीकनुसार, Nothing Phone 2a ची किंमत 400 डॉलर्स म्हणजेच अंदाजे 33,200 रुपये असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ताज्या रिपोर्टनुसार, नथिंगचा हा फोन अजून उत्पादनाच्या टप्प्यात आहे. Nothing चा हा आगामी स्मार्टफोन MWC मध्ये सादर केला जाऊ शकतो. तर, हा स्मार्टफोन 2024 च्या दुसऱ्या तिमाहीत भारतासह अनेक बाजारपेठांमध्ये लाँच केला जाईल.

Nothing Phone 2a चे संभावित स्पेसिफिकेशन्स

प्रसिद्ध टिपस्टर योगेश ब्रारने आपल्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यावरून आगामी स्मार्टफोनचे संभावित आणि अपेक्षित स्पेसीफिकेशन्स पुढे आले आहेत. Nothing Phone 2a मध्ये OLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह मिळेल. तसेच, हा फोन MediaTek Dimensity 7200 प्रोसेसरद्वारे सुसज्ज असेल. फोनच्या मागील बाजूस 50MP ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल.

स्टोरेज ऑप्शनबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येऊ शकतो. तसेच फोनमध्ये OS 2.5 ऑपरेटिंग सिस्टम उपलब्ध आहे, जो Android 14 वर आधारित असेल. नथिंगच्या या फोनच्या मागील बाजूस नवीन डिझाइन मिळण्याची अपेक्षा केली जात आहे. तर, Phone 2 प्रमाणे यात ग्लिफ लाइटिंग फीचर देखील असेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo