आगामी Nothing Phone (2a) चे भारतीय लाँच अखेर कन्फर्म! फोन Flipkart वर सूचीबद्ध, बघा सर्व डिटेल्स। Tech News 

आगामी Nothing Phone (2a) चे भारतीय लाँच अखेर कन्फर्म! फोन Flipkart वर सूचीबद्ध, बघा सर्व डिटेल्स। Tech News 
HIGHLIGHTS

आगामी स्मार्टफोन Nothing Phone (2a) ची चर्चा टेक विश्वात जोरात सुरु आहे.

अखेर नथिंग फोन (2a) च्या भारतातील लॉन्चची पुष्टी झाली आहे.

कंपनी MWC 2024 दरम्यान या फोनशी संबंधित तपशील उघड करू शकते.

आपल्या अनोख्या पारदर्शक डिझाईनसाठी प्रसिद्ध असलेले Nothing स्मार्टफोन भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. मागील काही दिवसांपासून कंपनीचा आगामी स्मार्टफोन Nothing Phone (2a) ची चर्चा टेक विश्वात जोरात सुरु आहे. आतापर्यन्त या फोनबद्दल अनेक लीक पुढे आले आहेत. त्यानंतर अखेर नथिंग फोन (2a) च्या भारतातील लॉन्चची पुष्टी झाली आहे. होय, कंपनीने केवळ लाँच नाही तर उपलब्धतेशी संबंधित तपशील देखील उघड केला आहे. हा फोन Flipkart वर लिस्ट करण्यात आला आहे. बघा सविस्तर-

हे सुद्धा वाचा: Good News! Vivo Y27 आणि Vivo T2 फोनच्या किमतीत मोठी कपात, जाणून घ्या नवीन किंमत। Tech News

Nothing Phone (2a) ची फ्लिपकार्ट लिस्टिंग

Nothing Phone (2a) फोन फ्लिपकार्टवर सूचीबद्ध झाला आहे. Nothing Phone (2A) फ्लिपकार्टवर लवकरच खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. याशिवाय, फोनच्या इतर फीचर्सशी संबंधित तपशील या सूचीद्वारे समोर आलेले नाहीत. आगामी काळात या फोनशी संबंधित इतर तपशीलही समोर येतील अशी अपेक्षा केली जाऊ शकते.

कंपनीने या स्मार्टफोनची लाँच तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. कंपनी MWC 2024 दरम्यान या फोनशी संबंधित तपशील उघड करू शकते, असे म्हटले जात आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, MWC 2024 इव्हेंट यावर्षी 27 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

Nothing Phone (2a) चे लीक फीचर्स

Nothing Phone 2 price cut during Flipkart Sale

वर सांगितल्याप्रमाणे, Nothing Phone (2a) बद्दल अनेक लीक्स पुढे आले आहेत. त्यानुसार, Nothing चा आगामी फोन Nothing Phone (2a) मध्ये 6.7-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले असेल. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह येऊ शकतो. याशिवाय फोन MediaTek Dimensity 7200 प्रोसेसरने सुसज्ज असू शकतो. यासोबत फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज आणि 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज मिळू शकते.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये Samsung S5KGN9 चा 50MP 1/1.5 इंच प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो. यासह, 50MP Samsung S5KJN1 अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 32MP Sony IMX615 फ्रंट कॅमेरा असण्याची अपेक्षा आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo