मागील काही दिवसांपासून Nothing च्या आगामी स्मार्टफोनच्या लाँचची चर्चा टेक विश्वात रंगली आहे. या स्मार्टफोनबद्दल अनेक लीक्स पुढे येत आहेत. त्यातच आता कंपनीने Nothing Phone (2a) च्या ग्लोबल लाँचची तारीख जाहीर केली आहे. कंपनीच्या दोन्ही स्मार्टफोन्सना युजर्सचा भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर कंपनीचा हा तिसरा स्मार्टफोन लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात Nothing Phone (2a) चे लॉन्चिंग डिटेल्स-
हे सुद्धा वाचा: Vivo V30 सीरीजची भारतीय लाँच टाइमलाईन जाहीर, दोन अप्रतिम स्मार्टफोन तुमच्या बजेटमध्ये होणार का लाँच? Tech News
Nothing ने आपल्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर हॅन्डलवर आगामी स्मार्टफोनच्या ग्लोबल लाँचची तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार, Nothing Phone (2a) स्मार्टफोन 5 मार्च 2024 रोजी जागतिक स्तरावर लाँच केला जाईल. या फोनचा लाँच इव्हेंट कंपनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनल आणि सोशल मीडिया हँडल्सवर Live पाहता येणार आहे.
Nothing Phone (2a) च्या किमतीबाबत स्मार्टफोन ब्रँड Nothing ने कोणतेही अधिकृत अपडेट दिलेले नाही. मात्र, लीकनुसार, हा फोन एकाधिक स्टोरेज आणि कलर ऑप्शन्समध्ये ऑफर केला जाईल. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 29 ते 32 हजार रुपयांच्या दरम्यान असेल, अशी अपेक्षा आहे.
आत्तापर्यंत समोर लीकनुसार, Nothing Phone (2a) ला देखील विद्यमान फोन्सप्रमाणे पारदर्शक डिझाइन दिले जाईल. स्मूथ फंक्शनिंगसाठी आगामी स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7200 चिपसेट मिळू शकतो. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये दोन कॅमेरे असतील. ज्यामध्ये 50MP मुख्य सेन्सर आणि अल्ट्रा वाइड लेन्स उपलब्ध असतील. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP कॅमेरा दिला जाईल. 4,290mAh बॅटरी प्रदान केली जाऊ शकते, जी 45W जलद चार्जिंगला समर्थन देईल. हा फोन जागतिक बाजारपेठेत Xiaomi, Oppo, Vivo, Realme आणि Samsung च्या स्मार्टफोन्सशी जबरदस्त स्पर्धा करणार आहे.