Nothing New Project: प्रसिद्ध कंपनीच्या सहकार्याने तुम्हाला देखील बनवता येईल नवा फोन, वाचा डिटेल्स। Tech News 

Nothing New Project: प्रसिद्ध कंपनीच्या सहकार्याने तुम्हाला देखील बनवता येईल नवा फोन, वाचा डिटेल्स। Tech News 
HIGHLIGHTS

कंपनीने आपल्या 'कम्युनिटी एडिशन प्रोजेक्ट'च्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे.

जगभरातील लोकांना Nothing Phone 2a च्या नवीन व्हेरिएंटसाठी त्यांच्या कल्पना मांडण्यासाठी आमंत्रित केले आहे.

कम्युनिटी व्हर्जन प्रकल्प सहा महिने चालेल आणि त्यात चार टप्प्यांचा समावेश असेल.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Nothingने आपला कम्युनिटी एडिशन प्रोजेक्ट रिव्हिल केला आहे. कंपनीने काही काळापूर्वी उद्योगाचा पहिला उपक्रम टीज केला होता. आता अखेर यावरून पडदा उचलण्यात आला आहे. कंपनीने आपल्या ‘कम्युनिटी एडिशन प्रोजेक्ट’च्या प्रोजेक्टचा खुलासा केला आहे. विशेष म्हणजे या अंतर्गत, Nothing ने जगभरातील लोकांना Nothing Phone 2a च्या नवीन व्हेरिएंटसाठी त्यांच्या कल्पना मांडण्यासाठी आमंत्रित केले आहे. हा उपक्रम अनोखा आणि वेगळा वाटतोय ना? चला तर मग सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

हे सुद्धा वाचा: Price Leak! लाँच होण्यापूर्वी OnePlus Nord CE4 ची किंमत लीक, ‘या’ फीचर्ससह घेणार जबरदस्त एंट्री। Tech News

Nothing Phone 2a अलीकडेच भारतात लाँच करण्यात आला आहे. आता कंपनी या फोनचा नवा व्हेरिएंट सादर करण्याच्या तयारीत आहे. यासाठी कंपनीने जगभरातील लोकांना आयडिया देण्यास सांगितले आहे.

Nothing कम्युनिटी एडिशन प्रोजेक्ट

Nothing चे संस्थापक आणि CEO कार्ल पेई यांनी Nothing Phone 2a कम्युनिटी एडिशन प्रोजेक्टची घोषणा केली. यासाठी UK-आधारित OEM कम्युनिटीकडून डिझाइन, वॉलपेपर आणि पॅकेजिंगवर कल्पना घेतली जात आहे. हे निमंत्रण सर्वांसाठी आहे. स्वारस्य असलेली कुणीही व्यक्ती आगामी फोन 2a व्हेरियंटसाठी आपल्या कल्पना सादर करू शकतात.

आगामी Nothing Phone 2a चे नवीन व्हेरिएंट कम्युनिटी आणि Nothing टीमची सहनिर्मिती असेल. म्हणजे नथिंग टीम आणि कम्युनिटीने दिलेल्या कल्पना एकत्र करून हा आगामी फोन बनवला जाणार आहे. यासाठी पेजही लाईव्ह करण्यात आले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, कम्युनिटी व्हर्जन प्रकल्प सहा महिने चालेल आणि त्यात चार टप्प्यांचा समावेश असेल.

आम्ही तुम्हाला सांगतो की, हार्डवेअर डिझाइन सबमिशन मार्चमध्ये होतील. यानंतर मे महिन्यात वॉलपेपरची रचना केली जाईल. त्यानंतर जूनमध्ये पॅकेजिंग डिझाइनसाठी आणि जुलैमध्ये मार्केटिंग कॅम्पिंगसाठी कल्पना सबमिट करणे आवश्यक आहे.

nothing phone 2a
nothing phone 2a

तुमच्या कल्पना ‘अशा’प्रकारे अपलोड करा.

सहभागी त्यांच्या आवडीनुसार आणि सोयीनुसार फोटो, व्हिडिओ आणि/किंवा इतर कोणत्याही मीडियाद्वारे त्यांचे मत व्यक्त करू शकतात, याची पुष्टी Nothing ने केली आहे. हे कम्युनिटी एडिशन प्रोजेक्ट पेजद्वारे अपलोड केले जाऊ शकतात. वर सांगितलेल्या, सर्व टप्प्यांसाठी कल्पना सादर करण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर निवडक कल्पनांवर मतदान घेण्यात येईल. सर्व वैध सबमिशन इंटर्नल नथिंग पॅनेलद्वारे फायनल केले जातील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo