आगामी Nothing Phone (2a) सर्टिफिकेशन साइटवर सूचीबद्ध, 45W फास्ट चार्जिंगसह करेल जबरदस्त Entry। Tech News 

आगामी Nothing Phone (2a) सर्टिफिकेशन साइटवर सूचीबद्ध, 45W फास्ट चार्जिंगसह करेल जबरदस्त Entry। Tech News 
HIGHLIGHTS

Nothing Phone (2a) सर्टिफिकेशन साइटवर सूचीबद्ध

यात 12GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज दिले जाऊ शकते.

फोनमध्ये 50MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो.

प्रसिद्ध आणि अनोख्या पारदर्शक डिझाईनसह येणाऱ्या आगामी Nothing Phone (2a) चे लाँच गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय आहे. हा आगामी मोबाईल फोन नुकताच TDRA प्रमाणन वेबसाइटवर पाहण्यात आला आहे. आता हा फोन TUV सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसला आहे, याद्वारे फोनचे चार्जिंग तंत्रज्ञान स्पेक्स उघड झाले आहेत. मात्र लक्षात घ्या की, या लिस्टिंगमधून फोनच्या इतर तपशिलांची कोणतीही माहिती मिळाली नाही.

हे सुद्धा वाचा: Revealing! iQOO Neo 9 Pro ची रॅम आणि कॅमेरा स्पेक्स उघड, फोटोग्राफीचा मिळेल उत्तम अनुभव फेब्रुवारीमध्ये होणार लाँच। Tech News

NOTHING PHONE 2A
NOTHING PHONE 2A

Nothing Phone (2a) चे कन्फर्म स्पेक्स

प्रसिद्ध प्रकाशनाच्या रिपोर्टनुसार, Nothing Phone (2a) स्मार्टफोन TUV वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंगनुसार, मोबाइल फोनचा मॉडेल क्रमांक A142 आहे. या हँडसेटमध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल. याव्यतिरिक्त वर सांगितल्याप्रमाणे, फोनबाबत जास्त माहिती उपलब्ध करून देण्यात आली नाही. तसेच, स्मार्टफोन ब्रँड नथिंगने देखील नथिंग फोन 2A लाँच करण्याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

Nothing Phone 2 price cut during Flipkart Sale

Nothing Phone (2a) चे अपेक्षित तपशील

अलीकडील अहवाल आणि पुढे आलेल्या लीकनुसार, Nothing Phone 2A स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले असेल, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका असेल. तसेच, हा फोन Android 14 वर आधारित OS वर काम करेल. या फोनमध्ये स्मूथ फंक्शनिंगसाठी MediaTek Dimensity 7200 चिपसेट मिळेल. तसेच, स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 12GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज दिले जाऊ शकते.

फोटोग्राफीसाठी या मोबाइल फोनमध्ये 50MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. तर, सेल्फीसाठी समोर 16MP कॅमेरा दिला जाऊ शकतो. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 4,290mAh बॅटरी असण्याची शक्यता आहे. या हँडसेटमध्ये ड्युअल सिम स्लॉट, Wi-Fi, GPS, ब्लूटूथ आणि USB टाइप-C पोर्ट सारखी कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळू शकतात.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo