digit zero1 awards

लोकप्रिय Nothing Phone 2 वर मिळतोय तब्बल 13 हजार रुपयांचा Discount, अशी ऑफर पुन्हा मिळणार नाही। Tech News 

लोकप्रिय Nothing Phone 2 वर मिळतोय तब्बल 13 हजार रुपयांचा Discount, अशी ऑफर पुन्हा मिळणार नाही। Tech News 
HIGHLIGHTS

Flipkart चा Year End Sale 9 डिसेंबरपासून सुरु झालेला असून 16 डिसेंबरपर्यंत लाईव्ह

Nothing Phone 2 फ्लिपकार्टवर 13,000 रुपयांच्या डिस्काउंट ऑफरसह

OIS सपोर्टसह 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 50MP सेकंडरी कॅमेरा मिळेल.

2023 च्या म्हणजेच या वर्षीच्या अखेरीस Flipkart चा Year End Sale सुरु झाला आहे. हा सेल 9 डिसेंबरपासून सुरु झालेला असून 16 डिसेंबरपर्यंत लाईव्ह असणार आहे. या सेलदरम्यान अनेक महागड्या उपकरणांवर भारी सवलती आणि ऑफर्स दिल्या जात आहेत. स्मार्टफोन्स, TV, लॅपटॉप्स इ. उपकरणे आकर्षक किमतीसह सूचीबद्ध करण्यात आली आहेत. ट्रान्सपरंट लुकसह ग्राहकांच्या मनावर राज्य करणारा लोकप्रिय फोन Nothing Phone 2 देखील सेलदरम्यान भारी सवलतींसह उपलब्ध आहे.

Nothing Phone 2 वरील ऑफर्स

Nothing ने हा स्मार्टफोन या वर्षी जुलै महिन्यात लाँच केला होता. फोनच्या 12GB + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत Flipkart वर 54,999 रुपये आहे. आत्ता तुम्ही हा फोन फ्लिपकार्ट सेलमधून अतिशय स्वस्तात खरेदी करू शकता.

Nothing Phone 2 price cut in India

तुम्ही फोनचा 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 13,000 रुपयांच्या डिस्काउंट ऑफरसह 41,999 रुपयांना खरेदी करू शकता. या फोनमध्ये दोन ब्लॅक आणि व्हाईट कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत. त्याबरोबरच, आणखी ऑफर्स देखील देण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Nothing Phone 2

Nothing Phone 2 स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. हा फोन Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह येतो. सुरक्षिततेसाठी यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. यासह, 12GB RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेज मिळेल. फोनमध्ये उपलब्ध कॅमेरा सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये OIS सपोर्टसह 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 50MP सेकंडरी कॅमेरा मिळेल. त्याबरोबरच, फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 45W वायर्ड आणि 15W वायरलेस फास्ट चार्जिंगसह उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo