Nothing Phone 2 Sale: बहुप्रतिक्षित स्मार्टफोनची सेल आजपासून होणार सुरु, 4,000 रुपयांची बचत करा

Nothing Phone 2 Sale: बहुप्रतिक्षित स्मार्टफोनची सेल आजपासून होणार सुरु, 4,000 रुपयांची बचत करा
HIGHLIGHTS

नथिंग फोन (2) ची सेल आज 21 जुलैपासून दुपारी 12 वाजता भारतात सुरू होणार

कंपनीचा हा नवीन फ्लॅगशिप फोन तुम्ही फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता.

Axis Bank आणि Citi क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार केल्यास 3000 रुपयांपर्यंतची झटपट सूट

बहुप्रतीक्षित Nothing Phone 2 अलीकडेच भारतात लाँच करण्यात आला आहे. त्यानंतर नथिंग फोन (2) ची सेल आज 21 जुलैपासून दुपारी 12 वाजता भारतात सुरू होणार आहे. नथिंगचा हा दुसरा Android स्मार्टफोन आहे, जो नुकतेच भारतासह जागतिक स्तरावर लॉन्च झाला. फोनच्या आकर्षक डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास, ही मागील फोन प्रमाणेच पारदर्शक लुकसारखी असेल. 

Nothing Phone 2 ची किंमत 

कंपनीचा हा नवीन फ्लॅगशिप फोन तुम्ही फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. कंपनीने हा फोन तीन स्टोरेज व्हेरियंटमध्ये लॉन्च केला आहे. हा फोन डार्क ग्रे किंवा व्हाईट कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

> 8GB रॅम+128GB स्टोरेज वेरिएंट= 44,999 रुपये 

> 12GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंट= 49,999 रुपये. 

> 12GB RAM + 512GB टॉप व्हेरिएंट= 54,999 रुपये.

Nothing Phone 2 वरील पहिल्या सेलमधील ऑफर्स 

1. ग्राहकांना Axis Bank आणि Citi क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार केल्यास 3000 रुपयांपर्यंतची झटपट सूट मिळेल.

2. HDFC बँकेच्या कार्डधारकांना 4,000 रुपयांपर्यंत फ्लॅट डिस्काउंट दिला जाईल. 

3. नथिंग फोन 2 खरेदी केल्यास फ्लिपकार्ट साइट केवळ 4,250 रुपयांमध्ये 6,999 रुपयांची नथिंग इअरस्टिक देणार आहे.

4. तुम्ही हा फोन 5,000 रुपयांच्या सुरुवातीच्या नो कॉस्ट EMI वर देखील खरेदी करू शकता.

Nothing Phone 2 चे स्पेसिफिकेशन्स 

Nothing Phone 2 ला 6.7-इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग सपोर्टसह येतो. 120 Hz चा रिफ्रेश दर प्रत्येक सेकंदाला 120 वेळा नवीन फ्रेम प्रदर्शित करण्यास अनुमती देतो. फोनमध्ये FHD + म्हणजेच 1080 x 2412 पिक्सल रिझोल्यूशनचा डिस्प्ले देण्यात आला आहे.

 हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरवर काम करतो. Snapdragon 8+ Gen 1 कंपॅटिबल नेटवर्कवर 10 गीगाबिट डाउनलोड स्पीड देणारा जगातील पहिला 5जी मॉडम- आरएफ सॉल्यूशन आहे. फोनमध्ये 12GB रॅम आणि 512GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजसाठी सपोर्ट आहे. 12GB रॅम विविध प्रकारचे हेवी गेम चालवण्यासाठी पुरेसे आहे.

नथिंग फोन 2 च्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 50MP प्राथमिक आणि 50MP अल्ट्रा वाइड कॅमेरा समाविष्ट आहे. 50MP कॅमेरा हाय-रिझोल्यूशन फोटो घेऊ शकतात आणि ट्रू-टू-लाइफ कलर देतात. नाईट साइट डार्क सेटिंग्जद्वारे अप्रतिम इमेजेस कॅप्चर करायला मदत करेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 32MP कॅमेरा उपलब्ध आहे. 32MP कॅमेरासह तुम्ही उत्तम सेल्फी कॅप्चर करण्यास सक्षम असाल. 

या स्मार्टफोमध्ये 4,700mAh ची बॅटरी मिळत आहे, सोबत 15W USB टाइप C फास्ट वायर्ड फीचर आहे. 15W USB-C फास्ट चार्ज तंत्रज्ञानासह, तुमची बॅटरी सुमारे 30 मिनिटांत शून्य ते 50% पर्यंत चार्ज होऊ शकते. फोनमध्ये सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल. हा फोन Android 12 पर बेस्ड नथिंग OS 2 वर काम करतो. फोनच्या मागील बाजूस नवीन Glypn लाइटिंग फीचर देण्यात आले आहे, ज्यामध्ये आता 33 झोन आणि 10 नवीन रिंगटोन नोटिफिकेशन्स मिळतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo