digit zero1 awards

ट्रान्सपरंट लुकसह येणारा Nothing Phone 2 लॉन्चिंगच्या 6 महिन्यानंतर लगेच स्वस्त, जाणून घ्या नवी किंमत।Tech News 

ट्रान्सपरंट लुकसह येणारा Nothing Phone 2 लॉन्चिंगच्या 6 महिन्यानंतर लगेच स्वस्त, जाणून घ्या नवी किंमत।Tech News 
HIGHLIGHTS

Nothing Phone 2 भारतात या वर्षी म्हणजेच 2023 जुलैमध्ये लाँच करण्यात आला.

Nothing Phone 2 ची किंमत भारतात 5,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.

तुम्ही सेल्फीचे शौकीन असाल तर फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा देखील मिळेल.

Nothing Phone 2 भारतात या वर्षी म्हणजेच 2023 जुलैमध्ये लाँच करण्यात आला होता. ही कंपनी कमी काळातच भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय झाली, Nothing Phone 2 कंपनीचा दुसरा स्मार्टफोन आहे. हा फोन लाँच होऊन अवघ्या 6 महिन्यांनंतर स्मार्टफोनच्या किंमत कपातीची घोषणा करण्यात आली आहे. हा फोन Flipkart वर अगदी स्वस्तात खरेदी करता येणार आहे. बघुयात फोनची नवी किंमत-

हे सुद्धा वाचा: Airtel ने लाँच केले आकर्षक प्रीपेड प्लॅन्स, अप्रतिम Unlimited बेनिफिट्ससह Disney+ Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध। Tech News

Nothing Phone 2 price cut in India

Nothing Phone 2 ची नवी किंमत

Nothing Phone 2 ची किंमत भारतात 5,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. यासह, हा फोन Flipkart वर 39,999 रुपयांच्या किंमतीसह सूचिबद्ध करण्यात आला आहे. तर या फोनची MRP 44,999 रुपये इतकी आहे. तसेच, तुम्ही 44,999 रुपयांमध्ये 12GB + 256GB स्टोरेजसह वेरिएंट खरेदी करू शकता. तर, 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज असलेले टॉप एंड मॉडेल 49,999 रुपयांना खरेदी करू शकता. येथून खरेदी करा

Nothing Phone 2

Nothing Phone 2

Nothing Phone 2 फोनमध्ये 6.7 इंच फुल HD LTPO OLED डिस्प्ले आहे, जो 1Hz ते 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. फोन Qualcomm 4nm Snapdragon 8+ Gen 1 SoC सह येतो. ज्याला Adreno 730 GPU सह 12GB रॅम सपोर्ट मिळेल. तसेच, या फोनमध्ये Dual SIM सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी नथिंग फोन 2 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50MP चा देण्यात आला आहे. यात Sony IMX890 सेन्सर देखील आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) आणि इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशन (EIS) सह देखील येईल. जर तुम्ही सेल्फीचे शौकीन असाल तर फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा देखील मिळेल. फोनला पॉवर देण्यासाठी 4700mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo