Nothing Phone 2 Pre-Booking: फक्त दोन दिवसांनी आगामी फोनची प्री-बुकिंग होणार सुरु, कसे कराल ऑर्डर?
आगामी Nothing Phone 2 अवघ्या दोन दिवसांनी म्हणजेच 29 जूनपासून प्री-ऑर्डरसाठी आणला जाणार आहे.
फ्लिपकार्टवर दुपारी 12 वाजतापासून फोनची प्री-बुकिंग सुरु केली जाईल.
नथिंग ऍक्सेसरीज पॅकेजवर 50% सूट.
आगामी Nothing Phone 2 ची लाँच डेट अलीकडेच कंपनीने जाहीर केली आहे. त्याबरोबरच, Nothing च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आगामी Nothing Phone 2 अवघ्या दोन दिवसांनी म्हणजेच 29 जूनपासून प्री-ऑर्डरसाठी आणला जाणार आहे. फ्लिपकार्टवर दुपारी 12 वाजतापासून फोनची प्री-बुकिंग सुरु केली जाईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, इच्छुक ग्राहक 2,000 रुपये भरून ऑर्डर सिक्योर करू शकतात, जे नंतर परत केले जातील.
Nothing Phone 2 प्री-बुकिंग ऑफर्स
– स्मार्टफोनची प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना इअर स्टिकवर 50% सूट मिळेल.
– नथिंग ऍक्सेसरीज पॅकेजवर 50% सूट.
– लिडिंग बँकसह झटपट कॅशबॅक समाविष्ट आहे.
Nothing Phone 2 ची प्री-ऑर्डर कसे कराल?
> Nothing Phone 2 खरेदी करण्यासाठी इच्छुक ग्राहक रिफंडेबल 2000 रुपये भरून प्री-बुकिंग करू शकतात.
> प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना 11 जुलै रात्री 9 PM ते 20 जुलै 11:59 PM दरम्यान तुमच्या आवडीचा व्हेरिएंट निवडता येईल.
> यानंतर तुम्हाला उर्वरित पेमेंट करावे लागेल. त्यानंतर तुम्ही खास प्री-ऑर्डर ऑफर्सचा लाभ घेऊ शकता.
Nothing Phone 2 बाबत लीक्स
Nothing चे CEO कार्ल पेई यांनी सांगितले आहे की, हा मागील स्मार्टफोनपेक्षा अधिक प्रीमियम असेल. भारतात या उपकरणाची किंमत 40,000 ते 45,000 रुपयांच्या दरम्यान असू शकते. मात्र, खरी किंमत लाँचनंतरच जाहीर केली जाईल. Nothing च्या आगामी स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट, 4700mAh बॅटरी आणि 6.7-इंचाचा FHD+ डिस्प्ले असेल अशी अपेक्षा आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile