अखेर ! बहुप्रतिक्षित Nothing Phone 2 ची लाँच डेट कंफर्म, ‘या’ दिवशी भारतात होणार दाखल
आगामी फोनच्या लाँच डेटबाबत अखेर नथिंगने घोषणा केली.
Nothing Phone 2 स्मार्टफोन 11 जुलै रोजी रात्री 8:30 वाजता लाँच केला जाईल.
नथिंग फोन 2 चे उत्पादन तामिळनाडूमधील बीवायडी कारखान्यात केले जाईल.
गेल्या काही महिन्यांपासून Nothing Phone 2 च्या लाँचची टेक विश्वात जोरदार चर्चा सुरु आहे. आगामी फोनच्या लाँच डेटबाबत अखेर नथिंगने घोषणा केली आहे. नथिंग फोन 1 ची अपग्रेडेड आवृत्ती म्हणून हे उपकरण जागतिक बाजारपेठेत सादर केला जाणार आहे. कंपनीने अद्याप फोनच्या किंमतीशी संबंधित कोणतेही अपडेट दिलेले नाही, परंतू भारतात सुरुवातीची किंमत 45,000 ते 50,000 रुपये असण्याची शक्यता आहे.
Nothing Phone 2 ची लाँच डेट
Nothing Phone 2 स्मार्टफोन 11 जुलै रोजी रात्री 8:30 वाजता लाँच केला जाईल, असे कंपनीने सांगितले आहे. या फोनचा लॉन्चिंग इव्हेंट कंपनीच्या अधिकृत YouTube चॅनलवर आणि सोशल मीडियावर लाईव्ह पाहता येईल.
Come to the bright side.
Meet Phone (2) on 11 July, 16:00 BST.
Join us for the official launch on https://t.co/pLWW07l8G7 pic.twitter.com/WoSw0gLJOx
— Nothing (@nothing) June 13, 2023
"नथिंग फोन 2 चे उत्पादन तामिळनाडूमधील बीवायडी कारखान्यात केले जाईल. कंपनीचा हा पहिला फोन नाही, जो भारतात तयार केला जाईल. यापूर्वी नथिंग फोन 1 भारतात तयार करण्यात आला होता.", असे नथिंग इंडियाचे व्हीपी आणि जीएम मनू शर्मा यांनी सांगतिले.
Nothing Phone 2 चे संभावित स्पेक्स
लीक्सनुसार, या डिव्हाइसमध्ये 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. यात स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 प्रोसेसर आहे. तसेच यासह 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज जोडली जाणार आहे. त्याबरोबरच, हँडसेटमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी पॅक होण्याची शक्यता आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile