Nothing Phone (1) खरेदी करण्याची उत्तम संधी, मिळतेय थेट 9 हजारांची सूट

Nothing Phone (1) खरेदी करण्याची उत्तम संधी, मिळतेय थेट 9 हजारांची सूट
HIGHLIGHTS

Nothing Phone (1) प्रचंड सवलतीत उपलब्ध

या फोनवर FLIPKART थेट 22% सूट देत आहे.

चला तर बघुयात फोनवर उपलब्ध इतर ऑफर्स

Nothing Phone (1) लॉन्च होण्यापूर्वीच चर्चेचा विषय होता. कारण या फोनचे डिझाईन चर्चेत होते, परंतु त्याची किंमत देखील ट्रेंडमध्ये आहे. पण आता तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही. कारण या फोनवर डिस्काउंट सुरु झाला आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला हा फोन अतिशय स्वस्तात मिळत आहे. चला तर मग आम्ही तुम्हाला सांगू की, तुम्ही हा फोन डिस्काउंटमध्ये कसा खरेदी करू शकता… 

हे सुद्धा वाचा : खुशखबर ! Aadhar सह सर्व महत्त्वाची कागदपत्रे एकाच वेळी होतील अपडेट, फक्त करा 'हे' काम

किंमत : 

तुम्ही Flipkart वरून नथिंग फोन (1) चा 256GB+8GB RAM व्हेरिएंट रु. 30,999 मध्ये खरेदी करू शकता. तर या फोनची MRP 39,999 रुपये आहे. म्हणजे तुम्हाला आधीच 22% सूट मिळाली आहे. यासोबतच तुम्हाला अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत. कंपनीकडून फोनची 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. 

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स : 

 Nothing Phone (1) मध्ये 6.55 इंच फुल HD + डिस्प्ले दिलेला आहे. या फोनची बॅटरी 4500 mAh आहे. म्हणजेच बॅटरी बॅकअपबाबत तुम्हाला कोणतीही तक्रार असणार नाही. तसेच, फोनमध्ये Qualcomm Snapdragon 778G+ प्रोसेसर उपलब्ध आहे. जर आपण या फोनच्या सर्वात मोठ्या वैशिष्ट्याबद्दल बोललो तर ते त्याचे डिझाइन आहे. याचे बॅक पॅनल कंपनीने अतिशय विचारपूर्वक डिझाइन केले आहे, जे खूपच आकर्षक दिसते.  

तसेच कंपनीने फोनच्या कॅमेऱ्यावरही बरेच काम केले आहे. यात 50MP+50MP कॅमेरा आहे. त्याबरोबरच, यात 16MP फ्रंट कॅमेरा आहे. जर तुम्ही वेगवान स्मार्टफोन शोधत असाल आणि तुम्हाला अँड्रॉइड स्मार्टफोन हवा असेल तर हा फोन तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरणार आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo