Nothing Phone 1चा पहिला फोन 12 जुलै रोजी लाँच होणार आहे, पण त्याआधी फोनचे फीचर्स सतत लीक होत आहेत. आता नथिंग फोन 1 ची किंमत देखील समोर आली आहे. असे सांगितले जात आहे की, नथिंग फोन 1 तीन व्हेरिएंटमध्ये सादर केला जाईल. Nothing Phone 1 ची सुरुवातीची किंमत $397 म्हणजेच जवळपास 31,300 रुपये आहे. भारतीय बाजारपेठेत नथिंग फोन 1 चे प्री-बुकिंगही सुरू झाले आहे.
हे सुद्धा वाचा : JIOने आणली खास सर्व्हिस! आता फोनमध्ये फोटो आणि व्हिडिओ स्टोअर करण्याचे टेन्शन संपणार
नथिंग फोन 1 च्या 8 GB रॅमसह 128 GB स्टोरेजची किंमत $ 397 म्हणजेच सुमारे 31,300 रुपये असू शकते. तसेच, 8 GB रॅमसह 256 GB स्टोरेजची किंमत $ 419 म्हणजेच सुमारे 33,000 रुपये आणि 12 GB रॅमसह 256 GB स्टोरेजची किंमत $ 456 म्हणजेच सुमारे 35,900 रुपये असण्याची शक्यता आहे.
नथिंग फोन 1 ची विक्री जुलैच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होईल, असे बोलले जात आहे. भारतीय बाजारपेठेत फोनची विक्री जागतिक विक्रीबरोबरच सुरू होईल. Flipkart वरून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
Nothing Phone 1 बद्दल बातमी आहे की यात 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.55-इंच लांबीचा OLED डिस्प्ले मिळेल. फोनला स्नॅपड्रॅगन 778G + प्रोसेसरसह 12 GB पर्यंत LPDDR5 रॅमसह 256 GB पर्यंत स्टोरेज मिळेल. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल, ज्यामध्ये प्राथमिक लेन्स 50 मेगापिक्सेल असेल. दुसरी लेन्स 16 मेगापिक्सेल आणि सेल्फीसाठी, यात 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.
कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth v5.2, GPS/ A-GPS आणि Type-C पोर्ट मिळेल. फोनमध्ये इंडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध असेल. यात डॉल्बी ATMOS स्पीकर मिळेल. नथिंग फोन 1 सह 45W फास्ट चार्जिंग उपलब्ध असेल. यामध्ये रिव्हर्स चार्जिंग देखील मिळेल.